Join us

​ संस्कृती करणार कॉमेन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2016 15:34 IST

 priyanka londhe     अभिनेत्री संस्कृती बालगुडे नेहमीच तिच्या वैविध्यपूर्ण अभिनयासाठी ओळखली जाते. अनेक चित्रपटांमध्ये तिने व्हर्सटाईल भूमिका स्वीकारुन ...

 priyanka londhe     अभिनेत्री संस्कृती बालगुडे नेहमीच तिच्या वैविध्यपूर्ण अभिनयासाठी ओळखली जाते. अनेक चित्रपटांमध्ये तिने व्हर्सटाईल भूमिका स्वीकारुन हे सिदध करुन दाखविले आहे. परंतू आता ती काही वेगळे करणार असल्याचे समजतेय. आपल्याला लवकरच संसक्ृती कॉमेन्ट्री करताना दिसणार आहे. परंतू ही कॉमेन्ट्री ती चित्रपटात करणार कि खरेच क्रिकेटच्या मैदानात उतरणार हे मात्र अजुन तरी समजलेले नाही. संस्कृती  चांगली अभिनेत्री असल्याचे आपण तिच्या अनेक चित्रपटांतील अभिनयामुळे पाहीलेच आहे. आता ती एक वेगळा प्रयोग करण्यास सज्ज झाली असल्याचे समजतेय. संस्कृतीने तिच्या या नवीन इनिंगसाठी काय तयारी केली आहे हे मात्र अजुन तरी गुलदस्त्यातच आहे. परंतू लवकरच संस्कृतीचे चाहते तिला कॉमेन्ट्री करताना पाहणार यात काही शंकाच नाही. संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणाºया परशा म्हणजेच आकाश ठोसर सोबत देखील संस्कृती लवकरच एफयू नावाच्या चित्रपटात आपल्याला दिसणार आहे. ती एक उत्तम नृत्यांगणा असल्याचे देखील आपण तिच्या डान्स परफॉरमन्समधून पाहिलेच आहे. आता संस्कृतीची कॉमेन्ट्री ऐकायला देखील प्रेक्षक नक्कीच उत्सुक असतील यात काही शंकाच नाही.