Join us  

CoronaVirus News: आता राज्यात आवाजाच्या सहाय्याने होणार कोरोना टेस्ट, आदित्य ठाकरेंनी केलं ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2020 7:30 PM

राज्यात कोरोनावर मात करण्यासाठी सरकार सातत्याने नवी पावले उचलत आहे. अशात वॉईस सॅम्पलने टेस्टिंगदेखील एक वेगळे पाऊल आहे.

ठळक मुद्देआदित्य यांनी स्वतःच ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.बीएमसी आवाजाच्या नमून्याचा वापर करून AI-आधारित कोविड टेस्टिंगचे एक परीक्षण करेल. आरटी-पीसीआर टेस्टिंगदेखील होत राहणार आहे.

मुंबई - देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशातील सर्वाधिक कोरोना प्रभावित राज्यांच्या यादीत महाराष्ट्र टॉपवर आहे. महाराष्ट्रात कोरना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आता महाराष्ट्र सरकार कोरोना टेस्टिंगसाठी एका नव्या तत्रज्ञानाचा वापर करणार आहे. या तंत्रज्ञानात केवळ आवाजाच्या सहाय्यानेच कोरोना तपासणी होणार आहे.

असे आम्ही नाही तर स्वतः शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. आदित्य यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. आदित्य ठाकरेंनी ट्विट केले आहे, की 'बीएमसी आवाजाच्या नमून्याचा वापर करून AI-आधारित कोविड टेस्टिंगचे एक परीक्षण करेल. आरटी-पीसीआर टेस्टिंगदेखील होत राहील, मात्र, जगभरात टेस्ट केल्या गेलेले तंत्रज्ञानान हे सिद्ध करतात, की महामारीने आपल्याला वेगळ्यापद्धतीने विचार करायला आणि आरोग्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करायला मदत केली आहे. 

राज्यात कोरोनावर मात करण्यासाठी सरकार सातत्याने नवी पावले उचलत आहे. अशात वॉईस सॅम्पलने टेस्टिंगदेखील एक वेगळे पाऊल आहे. राज्यातील कोरोनाच्या स्थितीवर नजर टाकली, तर शनिवारी राज्यातील 11 हजार 81 रुग्ण बरे होऊन घरी गेले. याच बरोबर राज्यातील कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचा आकडा 3 लाख 38 हजार 262 झाला आहे.

शनिवारी महाराष्ट्रातील रिकव्हरी रेट 67.26 टक्के एवढा होता. तर तब्बल 12 हजार 822 नवे रुग्ण समोर आले होते. तसेच 275 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत राज्याने पाठवलेल्या 26 लाख 47 हजार 20 सॅम्पल्सपैकी 5 लाख 3 हजार सॅम्पल्स पॉझिटिव्ह आले आहेत. 

राज्यात शनिवारपर्यंत 9 लाख 89 हजार 612 रुग्ण होम क्वारनटाइन होते. तर 35 हजार 625 इंस्टीट्यूशनल क्वारनटान आहेत. तसेच राज्यात शनिवारपर्यंत 1 लाख 47 हजार 48 सक्रिय लोक आहेत.

महत्त्वाच्या बातम्या -

व्वा! : भारतासह 'या' देशांत तयार होतेय नाकातून टाकता येणारी कोरोना लस, असं करते काम

CoronaVaccine : लठ्ठ लोकांवर परिणामकारक ठरणार नाही कोरोना लस? संशोधकांनी व्यक्त केली शक्यता

अयोध्येत बाबराच्या नावानं मशीद बनणार नाही, मुख्यमंत्री योगींना निमंत्रण देण्यावरही निर्णय

दारू सोडण्यासाठी वापरलं जाणारं औषध, आता कोरोनाविरोधात ठरणार उपयोगी; वैज्ञानिकांचा दावा

CoronaVirus vaccine : 50 टक्के प्रभावी ठरली तरी लोकांना दिली जाणार कोरोना लस

CoronaVirus vaccine : रशियाने इंग्लंड-अमेरिकेला टाकले मागे! भारतालाही पुरवणार कोरोना लस

खूशखबर : 10 ऑगस्टपर्यंत येऊ शकते 'रशियन' कोरोना लस?; आरोग्य मंत्री म्हणाले, परीक्षण पूर्ण

Naagin Revenge : नाग पंचमीच्या दिवशी मारला 'नाग', नागिनीचा आतापर्यंत 26 जणांना चावा!

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याआदित्य ठाकरेशिवसेनामहाराष्ट्रमुंबईराज्य सरकार