Join us

​लवकरच येतोय ‘वाल्या’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2016 16:38 IST

चित्रपट केवळ मनोरंजनच नाही तर समाजातील समस्या आणि प्रश्नांना वाचा फोडण्याचे उत्तम माध्यमदेखील बनू शकते. म्हणून तर सामाजिक आणि ...

चित्रपट केवळ मनोरंजनच नाही तर समाजातील समस्या आणि प्रश्नांना वाचा फोडण्याचे उत्तम माध्यमदेखील बनू शकते. म्हणून तर सामाजिक आणि राजकीय घटनांवर आधारित चित्रपटांची प्रेक्षकांना नेहमीच उत्सुकता असते.स्वातंत्र्य मिळून साठ दशकांपेक्षा अधिक उलटून गेला परंतु, अजुनही अनेक मागासलेल्या जमातीतील लोकांचा म्हणावा तितका विकास झालेला नाही. राजकारण्यांनी त्यांचा केवळ आपल्या राजकीय फायद्यासाठी हवा तसा उपयोग करून घेतला.याच विषयावर लेखक-दिग्दर्शक शरदचंद्र जाधव घेऊन आला आहे आगामी चित्रपट - ‘एका होत्या वाल्या’. चित्रपटात तोच प्रमुख भूमिकेत आहे.तो म्हणतो, ‘आदिवासी कोळी समाजाचाचे प्रश्न आणि राजकारणी नेत्यांचा ढोंगीपणाचा समाचार मी या चित्रपटातून घेतला आहे.’ अन्यायाच्या विरोधात लढा देणाऱ्या ‘वाल्या’च्या भूमिकेत तो दिसणार आहे.जयपूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाला सर्वोत्तम राजकीय चित्रपटाचा बहुमान मिळाला.चित्रपटात नंदकुमार पाटील राजकीय नेत्याच्या भूमिकेत असून प्रियंका ससाणे, अरविंद धानू, मनोहर भगत, सुनिल सोनार, मधूसुधन तेलंग, शांताराम सोनवणे आणि यशवंत जोशी यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.