कॉमेडीची बुलेट ट्रेन सुसाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2016 01:02 IST
कलाकार हा बॉलीवुडचा असो या मराठी इंडस्ट्रीचा प्रत्येकाला कलाकारासाठी प्रेक्षकांचे प्रेम हे खूप महत्वाचे असते. पण हे प्रेम कळणार कसे?
कॉमेडीची बुलेट ट्रेन सुसाट
कलाकार हा बॉलीवुडचा असो या मराठी इंडस्ट्रीचा प्रत्येकाला कलाकारासाठी प्रेक्षकांचे प्रेम हे खूप महत्वाचे असते. पण हे प्रेम कळणार कसे? तर यासाठी सोशलवेबसाईट हा उत्तम पर्याय आहे. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रॉम अशा विविध सोशवेबसाइटच्या माध्यमातून प्रत्येक कलाकाराला आपल्या प्रसिद्धीचा अंदाज देखील येतो. असाच एक अंदाज तेजस्विनी पंडितला इन्स्टाग्रॅमवर आला आहे. चक्क तिला खूप कमी कालावधीत ५० हजार जणांनी फॉलोवर्स केले आहे. याबातीत तिने या सोशवेबसाइटवर प्रेक्षकांचे आभार देखील मानले आहे. तसेच ५० हजार हा आकडा पाहून मी खूप आनंदी झाल्याचे ती सांगते. चला तर, या गुलाबाची कळीची बुलेट ट्रेन अशीच सुसाट निघो यासाठी शुभेच्छा देउयात.