Chinmay Mandlekar:चिन्मय मांडलेकर हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. आजवर अनेक मराठी नाटक, मालिका आणि सिनेमांमधून त्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही त्याने नाव कमावलं आहे. चिन्मय हा एक उत्तम लेखक आणि दिग्दर्शक देखील आहे. अनेक मालिका आणि नाटकांसाठी त्याने लेखन केलंय.
आपले चित्रपट आणि अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा चिन्मय मागील काही काळामध्ये त्याच्या वैयक्तिक आयु्ष्यामुळे चर्चेत आला होता. मुलांचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. या सगळ्यावर अभिनेत्याच्या पत्नीने नुकत्याच एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे. तसंच टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं आहे. अलिकडेच चिन्मय आणि त्याची पत्नी नेहाने अनुरुप विवाह संस्था ला मुलाखत दिली. तेव्हा नेहा म्हणाली,"तेव्हा मला खूप त्रास झाला होता. ज्या आईने नऊ महिने मुल वाढवलं, त्या मुलासाठी यातना सोसल्या आणि मोठ्या दिव्यातून गेली. त्या मुलाचं नाव मी काय ठेवलं? हे मला कोणी विचारुच कसं शकतं?मला हेही कळतं की, आपण एक पब्लिक फिगर म्हणून आपल्या कामाची जशी वाहवाह केली जाते. तसंच आपल्या कामावरून होणाऱ्या टीकेला सामोरं जाण्याची तयारी सुद्धा ठेवली पाहिजे. पण,हे काही काम नाही, ते माझं वैयक्तिक आयुष्य आहे."
मग नेहा म्हणाली," तेव्हा मला हा त्रास झाला की, त्या मुलाचे फक्त बाबा नाहीत, तर त्याची आई सुद्धा आहे जी या क्षेत्रातील नाही. तिल हे नाव आवडलं आणि तिने ते ठेवलं. त्यावर कोणी मला असं कसं सांगू शकतं की त्या नावाचा अर्थ जगज्जेता आहे तर मग तुम्ही विश्वजीत किंवा पृथ्वीराज नाव का नाही ठेवलं. तर नाही... मला माझ्या मुलाचं नाव दगडू ठेवायचं असेल तर मी ते ठेवणार. मला कोण का विचारणार? जर मी इतका मोठा गुन्हा केला असेल तर, भारत सरकार मला अटक करेल. तसं काही नाही झालं. माझ्या संविधानाने दिलेला हक्क मी बजावत आहे. मी आई असण्याचा हक्क बजावत आहे."
त्यातील एकानेतरी माझ्या समोर यावं...
"मी एक अशी मुलगी आहे जिला सिग्नल मोडल्याचा त्रास होतो. बाईक चालवताना कोणी बाईकडे वाईट नजरेने बघितलंतर मला त्रास होतो. मी अशीच आहे, आणि माझ्यासारखी माणसं या जगात आहेत म्हणून कदाचित या जगात थोडीतरी शिस्त आहे. त्यामुळे मला असं नेहमी वाटतं, ज्यांना कळतं किंवा ज्यांचं काहीतरी म्हणणं आहे. मग ते चूक किंवा बरोबर असो त्यांनी बोललं पाहिजे. तेव्हा या सगळ्याचा खूप त्रास झाला. माझं असं म्हणणं आहे, हे जे कोणी ट्रोलिंग करत आहेत, त्यातील एकानेतरी माझ्या समोर यावं. त्यांना इतिहासाबद्दल बोलायचं आहे का? ठीक आहे. आपण इतिहासापासून बोलू. मग मी नाव कसं चुकीचं किंवा कसं बरोबर आणि तुमचं कसं बरोबर आणि तुमचं कसं चूक हे आपण ठरवू... पण आता मला त्याने काहीच फरक पडत नाही." अशी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया नेहाने दिली.
Web Summary : Chinmay Mandlekar faced trolling for naming his son Jahangir. His wife, Neha, defended their choice, asserting her right as a mother. She challenged trolls to debate the name's validity face-to-face, emphasizing it's their personal decision.
Web Summary : चिन्मय मांडलेकर को बेटे का नाम जहांगीर रखने पर ट्रोल किया गया। उनकी पत्नी नेहा ने अपने फैसले का बचाव करते हुए एक माँ के रूप में अपने अधिकार पर जोर दिया। उन्होंने ट्रोलर्स को नाम की वैधता पर आमने-सामने बहस करने की चुनौती दी, और इसे उनका निजी निर्णय बताया।