Join us
Daily Top 2Weekly Top 5

Exclusive : संजय लीला भन्साळींच्या सिनेमात दिसणार 'हा' मराठमोळा हँडसम चेहरा, जाणून घ्या कोण आहे तो ?

By गीतांजली | Updated: April 1, 2019 09:00 IST

संजय लीला भन्साळी यांच्या 'मलाल' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये दोन स्टारकिड्स एन्ट्री घेतायेत. या सिनेमातून भन्साळी आपली भाची शर्मिन सहगल हिचा लॉन्च करत आहेत

ठळक मुद्देचेतन चिटणीसची भन्साळी यांच्या सिनेमात वर्णी लागली आहेसध्या सिनेमाचे शूटिंग अखेरच्या टप्प्यात आहे

संजय लीला भन्साळी यांच्या 'मलाल' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये दोन स्टारकिड्स एन्ट्री घेतायेत. या सिनेमातून भन्साळी आपली भाची शर्मिन सहगल हिला लॉन्च करत आहेत. तसेच अभिनेता जावेद जाफरीचा मुलगा मिजान जाफरीही बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. शर्मिन ही भन्साळींच्या बहीणीची मुलगी आहे. शर्मिनमधील टॅलेन्ट बघूनचं भन्साळींनी तिला लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे.

केवळ तिच्याचमुळे भन्साळी ‘मलाल’ प्रोड्यूस करत आहेत. विशेष म्हणजे या सिनेमाचे दिग्दर्शन एक मराठमोळा दिग्दर्शक करतोय. राष्ट्रीय पुरस्कार विजेते मंगेश हाडवळे या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. याच बरोबर या सिनेमातून एक मराठमोळा चेहरा बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यास सज्ज झाला आहे. चेतन चिटणीसची भन्साळी यांच्या सिनेमात वर्णी लागली आहे. चेतन या सिनेमात मिजान जाफरी याच्या मित्राची भूमिका साकारत असल्याचे त्यांने लोकमतशी बोलताना सांगितलंय. सध्या सिनेमाचे शूटिंग अखेरच्या टप्प्यात आहे. चेतनाच्या भूमिकेचे नाव सध्या गुलदसत्यात आहे.  

चेतनबाबत बोलायचे झाले तर त्यांने फोटोकॉपी सिनेमातून मराठीसिनेसृष्टी पदार्पण केले. त्यानंतर वजनदार सिनेमात चेतन महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. चेतनने मराठी मालिका आणि वेबसिरीजमध्ये दिसला. चेतन आर. माधवनच्या ब्रीथ या वेबसिरीजमध्ये देखील दिसला होता. सध्या तो एका मराठी बायोपिकच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

टॅग्स :संजय लीला भन्साळी