Join us

रसिकांना पुन्हा अनुभवता येणार 'चीटर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2018 15:31 IST

अजय फणसेकर दिग्दर्शित चीटर या चित्रपटाची प्रदर्शनापूर्वीच चर्चा खूप झाली होती.रूपेरी पडद्यावर कलाकारांची एंट्री होताच त्यांचे रसिकांनी भरभरून कौतुक ...

अजय फणसेकर दिग्दर्शित चीटर या चित्रपटाची प्रदर्शनापूर्वीच चर्चा खूप झाली होती.रूपेरी पडद्यावर कलाकारांची एंट्री होताच त्यांचे रसिकांनी भरभरून कौतुक केले होते.वैभव तत्ववादी आणि पूजा सावंत या तगडया कलाकारांचा या चित्रपटात समावेश  होता.विशेष या चित्रपटाची सत्तर टक्के शूटिंग परदेशात झाल्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता सर्व प्रेक्षकांनाही होती.चित्रपटाचे टायटल सॉगही तुफान हिट झाले होते.वैभव तत्ववादी याने सोशल मिडीयावरच शीर्षक गीत प्रदर्शित करत असल्याची माहिती रसिकांना दिली होती. ही कथा अभय नावाच्या एका भामट्या भोवती फिरत रहाते,जो चीटर या नावानेच प्रसिद्ध आहे.मॉरिशस वरून शिकण्यासाठी भारतात आलेल्या मृदुला नावाच्या मुलीच्या प्रेमात अभय पडतो. तथापि, जरी तो भामटा असला तरी व्यवसायाने एक वकील आहे आणि मृदुलाला प्रभावित करण्यासाठी तो खूप खोटे बोलतो.तो स्वतः एक पीएचडी करणारा विद्यार्थी असल्याची आणि एका उद्योगपतीचा मुलगा असल्याची बतावणी करतो.जेव्हा मृदुला मॉरिशसलापरत जाते तेव्हा तिचे वडील एक खूप मोठा जुना व्हिला विकत घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का देतात.पण मृदुलाच्या आजीला तिथे काहीतरी खटकत असते कारण तिला त्या घरात काहीतरी नकारात्मक ऊर्जा असल्याचे जाणवत असते.त्या आत्म्यापासून सुटका मिळवण्यासाठी ती एका अग्नीहोत्री ब्राम्हणाला विधीसाठी बोलावते.तेव्हा, अभय पुजाऱ्याचा वेश धारण करून मॉरिशसला पोचतो.त्यानंतर गोष्टी अविश्वसनीय गूढ वळण घेतात!