कोणाच्या बर्थडेला जमले एवढे सेलिब्रिटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2016 12:33 IST
फिटनेस आपल्या सर्वांसाटीच किती महत्वाचा असतो हे तर सगळेच जाणतात. आजकाल तर अगदी सिक्सपॅक ...
कोणाच्या बर्थडेला जमले एवढे सेलिब्रिटी
फिटनेस आपल्या सर्वांसाटीच किती महत्वाचा असतो हे तर सगळेच जाणतात. आजकाल तर अगदी सिक्सपॅक अॅब्स बनविण्यासाठी मुले धजपजतात. तर मुलींना अगदी साईज झिरो हवी असती म्हणून त्या जिम मध्ये घाम गाळतात. आता ही परिस्थिती तर सर्वसामान्या सगळ््यांचीच आहे. परंतू चित्रपटांमध्ये झळकणारे कलाकार तर त्यांच्या फिसटनेस बाबत किती जागरुक असतात हे तर आपल्याला माहितीच आहे. दररोज नियमित व्यायाम करणारे हे सेलिब्रिटी कोणत्या जिममध्ये जात असतील. या कलाकारांचे जिन कोच कोण असतील याची उत्सुकता तरक नक्कीच चाहत्यांना लागलेली असते. तर मराठी चित्रपटसृष्टीतील कितीतरी कलाकारांना फिटनेसचे धडे देऊन शैलेश परुळेकर सरांनी मार्गदर्शन केले आहे. वजनदार चित्रपटात आपल्याला एकदम गोलु मोलु लुकमध्ये दिसलेली प्रिया आता एकदम चवळीच्या शेंगेसारखी बारीक झालेली दिसत आहे. ती फक्त शैलेश सरांच्या मार्गदर्शनामुळेच. नुकताच शैलेश सरांचा ५० वा वाढदिवस झाला. त्यांच्या वाढदिवसाला चित्रपटसृष्टीली काही कलाकारांनी सरांना भेट देऊन बर्थडे सेलिब्रेशन केले. आपल्या गुरुचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. प्रिया बापट, उमेश कामत, सुबोध भावे, जिंतेद्र जोशी, अनिकेत विश्वासराव, अतुल कुलकर्णी, प्रतिक्षा लोणकर, अमृता सुभाष, संदेश कुलकर्णी, गितांजली कुलकर्णी, पल्लवी सुभाष आदी कलाकार मंडळी त्यांच्या वाढदिवसाला उपस्थित होते. या सर्वांच्या फिटनेसमागे शैलेश परुळेकर यांचा हात आहे. परुळेकरांच्या सर्व सेलिब्रिटी शिष्यांनी आपल्या गुरुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्यासोबतचा ग्रुप फोटो सोशल मिडीयावर शेअर केला आहे. १७ एप्रिल १९९९ साली त्यांनी कांदिवली येथे परुळेकर जिम्सची सुरुवात केली. पहिल्यांदा कांदिवली, मग गोरेगाव आता मीरारोड अशा परुळेकर्सच्या शाखा सुरू झाल्या आहेत. खरेतर मुंबईबाहेरही पुणे आदी शहरांतून त्यांच्याकडे शाखा सुरू करण्याची मागणी होते आहे. परुळेकर सर सेलिब्रिटी ट्रेनर म्हणुन ओळखू लागले आहेत. आता पाहूयात सर इतर शहरात त्यांच्या शाखा कधी सुरु करणार ते.