अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) हिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात घर केले आहे. तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. सोनाली सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा ती सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत येत असते. दरम्यान आज व्हॅलेंटाइन डे निमित्त सोनाली कुलकर्णी हिने स्पेशल पोस्ट शेअर केली आहे.
सोनाली कुलकर्णी हिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती आणि तिचा नवरा कुणाल बेनोडेकर आहे. या फोटोत ते दोघे रोमँटिक अंदाजात पोझ देताना दिसत आहेत. सोनालीने फोटो शेअर करत लिहिले की, लाँग डिस्टन्स मॅरिज... पण प्रेमाला सीमेची बंधंनं नसतात ना. सोनालीची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. तिच्या या फोटोला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे.
सोनाली कुलकर्णी हिच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकताच तिचा पांडू आणि झिम्मा हा चित्रपट रिलीज झाला आहे. या दोन्ही चित्रपटांना खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आहे. लवकरच ती व्हिक्टोरिया या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी व्यतिरिक्त अभिनेता पुष्कर जोग, आशय कुलकर्णी हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हीरा सोहल ही अभिनय क्षेत्रात पदार्पण करत असून जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी हे या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. या बिग बजेट चित्रपटाचे शूटिंग स्कॉटलंड येथे होणार आहे.