Join us
Daily Top 2Weekly Top 5

तेजस्वीनी लवकरच काढणार टॅटू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2016 14:05 IST

            टॅटू काढण्याची क्रेझ आणि हौस सध्या सगळीकडेच पाहायला मिळतेय. आपण अनेक कलाकारांच्या अंगावर ...

 
           टॅटू काढण्याची क्रेझ आणि हौस सध्या सगळीकडेच पाहायला मिळतेय. आपण अनेक कलाकारांच्या अंगावर देखील वेगवेगळ््या प्रकारचे टॅटू पाहिले आहेत. दिपिका, प्रियांका चोप्रा यांचे टॅटू तर बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय झाले होते. कलाकारांनी अंगावर टॅटू गोंदवून घेतले तर त्यांना काम करण्यासाठी  अडचण येऊ शकते असे बोलले जाते. परंतू आता मेकअपच्या कमालमुळे टॅटू देखील झाकता येतो. म्हणूनच की काय मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांना टॅटूची भूरळ पडली आहे. आता हेच पाहा ना, अभिनेत्री तेजस्वीनी पंडित म्हणतीय, माझ्या डोक्यात नवीन टॅट्यू काढण्याचा विचार सूरु आहे. बरं नवीन टॅटू काढायचा म्हणजे तुम्हाला वाटेल की तेजस्वीनी पहिल्यांदाच टॅटू काढणार आहे. तर तसे बिलकुलच नाहिये. तेजस्वीनीच्या हाताच्या बोटावर आणि पायावर आधीच दोन टॅटू आहेत. बाबा असे नाव तिने बोटावर गोंदवून घेतले आहे. तर नवºयाला बर्थडे गिफ्ट म्हणून दुसरा एक टॅटू तिने काढला आहे. यावरूनच आपल्याला समजते की तेजस्वीनीला टॅटूची किती आवड आहे. आता तेजस्वीनी पुन्हा एकदा टॅटू काढण्यासाठी सज्ज झाली आहे. तो टॅटू ती कुढे काढणार आणि कशाप्रकारचा असेल हे तरी अजून गुलदस्त्यातच आहे.