Join us
Daily Top 2Weekly Top 5

भार्गवी चिरमुले हिचा आज वाढदिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2016 15:55 IST

मराठी इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकणारी अभिनेत्री भार्गवी चिरमुले या सुंदर अभिनेत्रीचा आज वाढदिवस आहे. फेसबुक, टिविटर, इन्स्टा ...

मराठी इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकणारी अभिनेत्री भार्गवी चिरमुले या सुंदर अभिनेत्रीचा आज वाढदिवस आहे. फेसबुक, टिविटर, इन्स्टा यांसारख्या सोशलमिडीयाच्या माध्यमातून श्रुती मराठे, मानसी नाईक,सुकन्या काळण अशा अनेक कलाकारांनी भार्गवीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भार्गवी सध्या सिया के राम या हिंदी मालिकेत काम करित आहे. या सुंदर अभिनेत्रीने वहिनीसाहेब, अनुबंध, पिंजरा, असभंव यांसारख्या अनेक मराठी मालिकेत तिने काम केले आहे. तसेच संदूक, इश्कवाला, नवरा माझा भवरा, गोळा बेरीज असे अनेक मराठी चित्रपटदेखील तिने मराठी इंडस्ट्रीला दिले आहे. अशा या सुंदर अभिनेत्रीला लोकमत सीएनएक्सच्यावतीने देखील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.