Join us
Daily Top 2Weekly Top 5

आज आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे यांचा लग्नाचा वाढदिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2016 16:32 IST

आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानिटकर-कोठारे यांच्या लग्नाला आज पाच वर्षे पूर्ण झाली आहे. या पाच वर्षातील त्यांचे हे प्रेम ...

आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानिटकर-कोठारे यांच्या लग्नाला आज पाच वर्षे पूर्ण झाली आहे. या पाच वर्षातील त्यांचे हे प्रेम आज ही तितकेच बहरलेले दिसत आहेत. शुभमंगल सावधान या चित्रपटासाठी ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे हे नवीन चेहºयाचा शोघ घेत होते. त्यावेळी उर्मिला कोठारे ही महेश कोठारे यांच्या घरी आली होती. त्यावेळी आदिनाथ नुकताच झोपेतून उठला होता. त्यावेळी झोपेतून उठताच उर्मिलाला पाहताच तिच्या प्रेमात पडलो असल्याचे कबूली आदिनाथ यापूर्वी दिली आहे.उर्मिला अभिनेत्री म्हणून उत्तम आहेच पण पत्नी म्हणून मला जास्त आवडते. आमची सर्वसामान्य माणसांप्रमाणे भांडणे होतात पण त्यातून चांगलेच निष्पन्न होते असे मत नेहमीच आदिनाथ विविध कार्यक्रमांमध्ये मांडताना पाहायला मिळतो.आदिनाथा कोठारे आणि उर्मिला कोठारे यांनी आतापर्यत अनवट, दुभंग हे चित्रपट केले आहेत. भविष्यात या दोघांना एकत्रित चित्रपटात पाहण्यासाठी प्रेक्षकदेखील उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे. आदिनाथने कोठारे याने नुकतेच अभिनयातून दिग्दर्शनाकडे वळला आहे. त्याने   महाराष्ट्रातील दुष्काळावर आधारीत पाणी या वास्तवाची जाणिव करून देणारा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे.  तसेच उर्मिलादेखील  महाराष्ट्राच्या तमाम रसिकांवर हुकुमत गाजवलेली तमाशासम्राज्ञी म्हणजे विठाबाई नारायणगांवकर यांच्या भूमिकेत लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.आदिनाथ कोठारे याने माझा छकुला या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्ट्रीत पदापर्ण केले आहे. यातील त्याची बालकलाकारची भूमिका आज ही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. तसेच उर्मिलानेदेखील शुभमंगल सावधान या चित्रपटातून चित्रपटसृष्ट्रीत एन्ट्री केली. चित्रपटाप्रमाणेच हे दोघेही सध्या मालिकेमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. नुकतीच उर्मिला कोठारे ही मालिकेच्या माध्यमातून आहिल्याबाई होळकर या भूमिकेत प्रेक्षकांना दिसली. तर आदिनाथ कोठारे हादेखील सध्या हड्रेड डेझ या मालिकेत प्रेक्षकांना दिसत आहे.