Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठमोळ्या अभिनेत्रीने पुन्हा एकदा केले न्यूड फोटोशूट, सोशल मीडियावर खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 11:34 IST

नुकतेच तिने एक न्यूड फोटोशूट केले. या फोटोशूटचे काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेत आणि खळबळ माजली.

ठळक मुद्दे  निकिताने ‘कॉलेज’ या सिनेमात काम केले आहे.

आपल्या बोल्ड अदांसाठी ओळखली जाणारी मराठमोळी मॉडेल आणि अभिनेत्री निकिता गोखले सध्या सोशल मीडियावर जाम चर्चेत आहे. होय, निकिताचे न्यूड फोटो इंटरनेटवर अक्षरश: धुमाकूळ घालत आहेत. निकिता गोखले सर्रास तिचे बोल्ड व हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच तिने एक न्यूड फोटोशूट केले. या फोटोशूटचे काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेत आणि खळबळ माजली.

 या फोटोमध्ये निकिताचा बोल्ड आणि हॉट अवतारात दिसत आहे. डार्क रेड लिपस्टिक आणि लाइट न्यूड मेकअपमधील निकिताचा न्यूड अवतार पाहून अनेकजण थक्क झालेत.

  याआधीही तिने अनेकदा तिच्या इन्स्टाग्रामवर अशाप्रकारे न्यूड, सेमी न्यूड आणि बोल्ड फोटो शेअर केले आहेत. महाराष्ट्राच्या भंडारा जिल्ह्यातील तुमसर गावात जन्मलेल्या निकिताचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण तुमसर येथेच झाले. यानंतर नागपुरात आली. याठिकाणी तिने शेअर मार्केटशी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण केला. पाठोपाठ आयआयएफएलमध्ये कामाला लागली. मात्र यानंतर मॉडेलिंग आणि अभिनयात नशीब आजमावायचा निर्णय तिने घेतला. यासाठी तिने अनुपम खेर यांच्या फिल्म अ‍ॅकेडमी व टेरन्स लुईसच्या डान्स अ‍ॅकेडमीत प्रवेश घेतला आणि तिच्या मॉडेलिंग करिअरची सुरुवात झाली.

 निकिताने आत्तापर्यंत मिस इंडिया बिकिनी 2015 आणि मिस ग्लॅमर फेस वर्ल्ड 2016 या स्पर्धा जिंकल्या. मिस वर्ल्ड बिकिनी 2015 स्पर्धेत तिने अंतिम फेरीत धडक दिली होती. निकिताचे हॉट फोटोशूट पाहून तिला प्लेबॉय या प्रसिद्ध मासिकाकडून फोटोशूटचे निमंत्रण आले होते.

  निकिताने ‘कॉलेज’ या सिनेमात काम केले आहे.  हा सिनेमा 2015 साली रिलीज झाला होता. याशिवाय काही मीडिया रिपोर्टनुसार निकिताला 2018 मध्ये बिग बॉस रिअलिटी शोची आॅफर मिळाली होती.