Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठी सिनेसृष्टीतील या दोन हिऱ्यांना ओळखलं का? आता चेहराच बदलला, दिसतात खूपच हँडसम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 13:57 IST

मराठी सिनेसृष्टीतील दोन कलाकारांचा फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतो आहे. या फोटोत दिसणारे हे कलाकार मराठीतील सुपरस्टार आहेत.

मराठी सिनेसृष्टीतील दोन कलाकारांचा फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतो आहे. या फोटोत दिसणारे हे कलाकार मराठीतील सुपरस्टार आहेत. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या या दोघांनीही अभिनयाचं टॅलेंट आणि मेहनतीच्या जोरावर मराठी कलाविश्वात स्थान मिळवलं आहे. या फोटोत दिसणाऱ्या या कलाकारांनी अनेक सुपरहिट सिनेमे सिनेसृष्टीला दिले आहेत. फोटोत अगदी साधे दिसणारे हे कलाकार आता खूपच हँडसम दिसतात. 

फोटोत दिसणारे हे कलाकार म्हणजे अभिनेता अंकुश चौधरी आणि भरत जाधव आहेत. आज भरत जाधव यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अंकुश चौधरीने खास पोस्ट शेअर केली आहे. "१९९० रंगमंचावरचा वावर तेव्हाही खणखणीत  आणि आजही तितकाच प्रामाणिक. ऊर्जा अजूनही सोळाव्या वर्षाच्या मुलांसारखी—नव्या जोमाची ठिणगी! मराठी मनोरंजनाचा सदाबहार चेहरा, महाराष्ट्राचा अभिमान- आमचा अभिमान भरत जाधव! Happy Birthday to सुपरस्टार who still rules every stage and every heart!", असं म्हणत अंकुश चौधरीने भरत जाधव यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. 

भरत जाधव यांनी नाटक, सिनेमा आणि टेलिव्हिजन अशा तिनही माध्यमांमध्ये काम करून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. जत्रा, पछाडलेला, आता थांबायचं नाय, शिक्षणाच्या आयचा घो, खबरदार, क्षणभर विश्रांती हे त्यांचे गाजलेले सिनेमे. सही रे सही, श्रीमंत दामोदर पंत ही नाटकही गाजली आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Marathi cinema's handsome heroes: Ankush Choudhari celebrates Bharat Jadhav's birthday.

Web Summary : Ankush Choudhari's birthday wishes to Bharat Jadhav go viral. These superstars, from humble backgrounds, conquered Marathi cinema with talent and hard work, delivering numerous hits. Their transformation is remarkable. Jadhav, a versatile actor, has excelled in theatre, film, and television, delivering memorable performances.
टॅग्स :भरत जाधवअंकुश चौधरीमराठी अभिनेता