माधवी निमकरचे साडीत खुलले सौंदर्य,बघा हा खास PHOTO
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2018 16:54 IST
अभिनेत्री माधवी निमकरचे सौंदर्य साडीत पहा कसं खुलून आलंय.... तिची साडीतली प्रत्येक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाही...साडीतल्या वेगवेगळ्या ...
माधवी निमकरचे साडीत खुलले सौंदर्य,बघा हा खास PHOTO
अभिनेत्री माधवी निमकरचे सौंदर्य साडीत पहा कसं खुलून आलंय.... तिची साडीतली प्रत्येक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाही...साडीतल्या वेगवेगळ्या अदांनी जणू काही माधवीच्या सौंदर्याला चारचाँद लावलेत....साडी परिधान केलेला माधवीचा हा फोटो पाहून चाहत्यांनी तिला भरभरून कमेंटस आणि लाईक्सचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळत आहे.मल्टी कलर साडी परिधान करत माधवीच्या या लूकवर चाहतेही फिदा होत आहेत. तिच्या या साडी लूकला भरभरुन पसंती मिळते...मुळात वयाच्या 33 साव्या वर्षीही माधवी फिट आणि गॉर्जिअस दिसते.जीवनात आमूलाग्र असा बदल हवा असेन तर योगा करणे उत्तम असल्याचे माधवीला वाटते.गेल्या काही वर्षापासून माधवी नित्यनियमाने योगा करते आणि इतरांनाही योगा करण्याचा सल्ला देते.फिट राहण्यासाठी योगापेक्षा दुसरा चांगला पर्याय असूच शकत नाही.त्यामुळं ती पारंपरिक योगा करते.डाएट म्हणजे कमी खाणं असं अनेकांचा गैरसमज आहे. मात्र तसं काही नसतं. मी आरोग्यला पोषक असं डाएट घेते म्हणजेच तेलकट पदार्थ खाणं टाळणं. मी भात खात नाही. जेवणात आवश्यकतेपेक्षा जास्त तूप घेत नाही आणि गोडही कमी खाते. सध्या मी स्विमिंग शिकतेय. अशारितीने योगाभ्यास, स्विमिंग, योग्य डाएट आणि व्यायाम यामुळं मी स्वतःला फिट आणि मेंटेन ठेवू शकते.तिचे सोशल मीडियावर फोटो पाहिल्यास माधवी रील लाईफप्रमाणेच रिअल लाईफमध्येही खूप ग्लॅमरस आहे. सध्या माधवीचा हा साडी लूक फोटो पाहून चाहत्यांना घायाळ करण्यासाठी केवळ हॉट लूकच गरजेचा असतो असे नाही.आपल्या सोज्वळ सौंदर्यानेही चाहत्यांना घायाळ करू शकतात हेच या फोटोने सिध्द केल्याचे पाहायला मिळत आहे.cnxoldfiles/a>या मालिकेत माधवीने साकारलेली शालिनी रसिकांच्या मनात घर करुन गेली आहे.या मालिकेतील ग्लॅमरस आणि स्टायलिश शालिनीला रसिकांनी डोक्यावर घेतलं. मालिकेतील तिचा हा अंदाज घराघरातील रसिकांना भावला. रिल लाइफप्रमाणे रिअल लाइफमध्येही शालिनी अर्थात माधवी तितकीच ग्लॅमरस आणि स्टायलिश आहे.