Join us

'दिल्या घरी तू सुखी राहा...!', नव्या सुरूवातीसाठी दिपाली सय्यदने या अभिनेत्रीला दिल्या शुभेच्छा

By तेजल गावडे | Updated: January 7, 2021 14:08 IST

अभिज्ञा भावेनंतर आता ही अभिनेत्री लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.

अभिनेत्री मानसी नाईक लवकरच तिचा बॉयफ्रेंड प्रदीप खरेरा सोबत लग्नबेडीत अडकणार आहे. काही दिवसांपूर्वी मानसी नाईकने बॅचलर पार्टीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. आता तिची जवळची मैत्रीण म्हणजेच अभिनेत्री दिपाली सय्यदने तिच्यासोबतचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 

दिपाली सय्यदने इंस्टाग्रामवर मानसी नाईक सोबतचे फोटो शेअर करत लिहिले की, प्रिय मनू, आपल्या आयुष्यातील खरंतर इतक्या वर्षाचा प्रवास,तुझ्यासोबत किती सहजपणे निघून गेला कळलंच नाही, आज संसारात वावरताना, मैत्रीण, आई, मुलगी, बहिण अशा कित्येक नात्यात वावरतानाआयुष्यातल्या चढउतारात, सुख दुःखात एकमेकांच्या मागे, खंबीरपणे उभ राहून एकमेकांना साथ दिली...! आपली मैत्री म्हणजे आयुष्यातील अनमोल आणिअतूट क्षणांच्या आठवणींचा ठेवा ...मनू लवकरच तुझ्या आयुष्याची नवीन सुरवात होत आहे ... मी तुम्हा दोघांनाही सुखी संसारासाठी शुभेच्छा देते. शेवटी एकच लिहावंसं वाटतं !!कायम आनंदी रहा मनू दिल्या घरी तू सुखी राहा.

मानसी नाईक १९ जानेवारीला लग्न करणार आहे. तिनेच सोशल मीडियाद्वारे ही गोष्ट तिच्या चाहत्यांना सांगितले आहे.

प्रदीप हा एक इंटरनॅशनल बॉक्सर आहे. तर मानसी ही उत्तम डान्सर असून ढोलकीच्या तालावर, हॅलो बोल, मराठी तारका यांसारख्या अनेक मराठी रिअ‍ॅलिटी डान्सिंग शोच्या माध्यमातून तिने आपल्या डान्सचे जलवे दाखवले आहेत. याशिवाय रुपेरी पडद्यावरही मानसीने आपल्या अभिनयाद्वारे रसिकांची मनं जिंकली आहेत.

एकता - एक पॉवर, कुटुंब, तीन बायका फजिती ऐका, जबरदस्त, मर्डर मेस्त्री, ढोलकी, हू तू तू, कोकणस्थ यांसारख्या चित्रपटांमध्ये मानसीने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.

टॅग्स :दीपाली सय्यदमानसी नाईक