Join us

मराठी चित्रपटांचा प्रेक्षक जास्त चोखंदळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2016 12:46 IST

आपल्या जीवनाशी निगडीत विषयांवर मराठी चित्रपट येत आहेत. त्यामुळे अलीकडे मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांचा कल हा मोठा वाढला आहे. हिंदी ...

आपल्या जीवनाशी निगडीत विषयांवर मराठी चित्रपट येत आहेत. त्यामुळे अलीकडे मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांचा कल हा मोठा वाढला आहे. हिंदी चित्रपटातही जे प्रेक्षकांना मिळत नाही. ते मराठीतून मिळत असून, मराठीचा प्रेक्षक हा जास्त चोखंदळ असल्याचे अभिनेता संजय खापरे यांनी लोकमत सीएनएक्सशी बोलताना सांगितले. नियाज मुजावर दिग्दर्शित डिस्को सन्या हा मराठी चित्रपट ५ आॅगस्टला प्रदर्शित होत आहे. एका गर्विष्ट व करोडपती बिझनेसमन व सिग्नलवर विविध वस्तू विकून जगणारा व माणूसकी जपणारा एक लहानगा डिस्को सन्या यांच्यातील एका छोट्याशा घटनेवरुन सुरु झालेला संघर्ष  यामध्ये आहे.  या संघर्षामधूनच दोघांच्या आयुष्यात घडलेले बदल  या चित्रपटाची कथा आहे.  कुटुंबात लहानपासून मोठ्यापर्यंत सर्वचजण बघू शकतील असा हा चित्रपट आहे. माझ्या आतापर्यंतच्या चित्रपटापेक्षा  हा खूप वेगळा चित्रपट असून, त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत. यामध्ये  वंडर किड पार्थ भालेराव डिस्को सन्या  चित्रपटातून पहिल्यांदाच लीड रोलमध्ये दिसणार आहे.  तर बिझनेसमन श्रेयस काळे याच्या भूमिकेत संजय खापरे आहे. संगीतकार व निमार्ता सचिन पुरोहित व अभिजीत कवठाळकर आहेत. तसेच पांरपारिक पद्धतीने केवळ नायक - नायिका किंवा दोन संख्या मित्रांच्या जोडींमधील प्रेम न दाखवता दोन वैºयांमधील कसरती दाखविणारा हा आगळा वेगळा चित्रपट असणार आहे. अभिनेत्री चित्रा खरे, गौरी कोंगे, अभिनेते सुहास शिरसाठ, उमेश जगताप यांचादेखील या चित्रपटात समावेश आहे.