Join us
Daily Top 2Weekly Top 5

श्रृती-गौरव बॅक टू वर्कआऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2016 13:05 IST

अभिनेत्री श्रृती मराठे आणि अभिनेता गौरव घाटनेकर नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. या नव विवाहीत दांपत्यांच्या लग्नाला अजुन चार दिवस ...

अभिनेत्री श्रृती मराठे आणि अभिनेता गौरव घाटनेकर नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. या नव विवाहीत दांपत्यांच्या लग्नाला अजुन चार दिवस झाले नाहीत तो पर्यंत हे दोघेही कामाला देखील लागले आहेत. काही दिवसांपूर्वी मराठी चित्रपटसृष्टीत लगीनघाई पहायला मिळाली होती. अनेक कलाकारांनी यावेळी शुभमंगल केल्याचे आपण पाहीलेच होते. लग्नानंतर या जोड्या परदेशी हनिमुनला देखील गेल्या असल्याचे समजत आहे. काही जण थायलंडला गेले तर काही जणांनी मालदिवच्या निसर्गरम्य ठिकाणात हा स्पेशल टाईम स्पेंड केला आहे. परंतू श्रृती आणि गौरव हे दोघे मात्र लगेचच बॅक टू पॅवेलियन आले आहेत का असेच वाटत आहे. कारण नुकतेच या दोघांनी एक झक्कास फोटो सोशल साईटसवर अपलोड केला आहे. श्रृती सांगतेय, अ‍ॅन्ड वी आर बॅक टू वर्कआऊट्स.... फिटनेस...जिम .... क्या बात है श्रृती अजुन हातावरची मेहंदी उतरलेली नाही तो पर्यंतच ही नवी नवरी जिमला देखील जायला लागली आहे.