Join us

​अस्मिता-अभिचा झाला साखरपुडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2016 11:35 IST

मालिका वा चित्रपटात एकमेकांसोबत काम करता करता कलाकार एकमेकांच्या प्रेमात पडल्याची अनेक उदाहरणे आहेत. अमिताभ-जया, धर्मेंद्र- हेमामालिनी, दीपिका-रणवीपर्यंत अनेकजण ...

मालिका वा चित्रपटात एकमेकांसोबत काम करता करता कलाकार एकमेकांच्या प्रेमात पडल्याची अनेक उदाहरणे आहेत. अमिताभ-जया, धर्मेंद्र- हेमामालिनी, दीपिका-रणवीपर्यंत अनेकजण आपल्या सहकलाकाराच्या प्रेमात पडले आणि कायम एकत्र राहिले. मराठी चित्रपटसृष्टीतही उमेश कामत-प्रिया बापट, सौरभ गोखले- अनुजा साठे, आदिनाथ कोठारे- उर्मिला कानेटकर अशा जोड्या पाहायला मिळतात. हे सगळं आता सांगायच कारण म्हणजे रील लाईफमधील जोडीदार आता रिअल लाईफमध्येही जोडीदार बनले आहेत. ती जोडी म्हणजे मयुरी वाघ आणि पियुष रानडे अर्थात 'अस्मिता-अभि' यांची...'अस्मिता' या मालिकेत खाजगी गुप्तहेराची भूमिका साकारणारी मयुरी वाघ आणि त्याच मालिकेत तिच्या पतीची म्हणजेच अभिची भूमिका साकरणारा पियुष रानडे या दोघांचाही नुकताच साखरपुडा झाला आहे. अस्मिता-अभिची मालिकेतील ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडायची आणि ख-या आयुष्यातही त्यांची जोडी असावी असेही अनेकांना वाटायचं. मयुरी-पियुषच्या चाहत्यांची ही इच्छा आता खरी झाली असून त्या दोघांनी आता आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. प्रेक्षकांची ही आवडती जोडी पुढच्या वर्षी लग्नबंधनात अडकणार आहे. 'अस्मिता' मालिकेत काम करता करता माझी आणि पियुषची ओळख झाली. गेल्या दोन वर्षांपासून एकत्र काम करत आहोत आणि त्याच काळात आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र बनलो. कोणतीही गोष्ट, सिक्रेट, सुख-दु:ख आम्ही एकमेकांशी शेअर करू शकतो. आमची पडद्यावरची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते आणि ती प्रत्यक्षातही साकारावी अशी इच्छा अनेकांनी आमच्यासमोर बोलून दाखवली. काही काळानंतर आम्हालाही असं वाटलं की, आम्ही एवढे छान मित्र आहोत की एकमेकांसोबत संपूर्ण आयुष्य एकत्र घालवू शकतो. आमच्या घरच्यांशी हा निर्णय डिस्कस केला असता त्यांनीही आनंदाने आम्हाला मान्यता दिली. आपल्याच आवडत्या माणसासोबत पूर्ण आयुष्य घालवता येणार आहे हा विचारच खूप सुखद आहे आणि आम्ही दोघेही खूप खुश आहोत.- मयुरी वाघ, अभिनेत्री