Join us
Daily Top 2Weekly Top 5

​अशोक सराफ यांच्या मुलाला अभिनयात नव्हे तर या क्षेत्रात आहे रस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2017 12:19 IST

आई वडील एकाच क्षेत्रात असले की, त्यांची मुले देखील त्याच क्षेत्राची निवड करतात असे आपण अनेकवेळा पाहिले आहे. त्यामुळे ...

आई वडील एकाच क्षेत्रात असले की, त्यांची मुले देखील त्याच क्षेत्राची निवड करतात असे आपण अनेकवेळा पाहिले आहे. त्यामुळे डॉक्टर, वकील यांची मुले देखील अनेकवेळा डॉक्टर, वकीलच बनतात. अभिनय क्षेत्रात तर आपल्याला ही गोष्ट हमखास पाहायला मिळते. आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अनेक जण अभिनय क्षेत्रातच आपले प्रस्थ निर्माण करायचा प्रयत्न करतात. अमिताभ बच्चन, राकेश रोशन, जितेंद्र अशा अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांची पुढची पिढी देखील सध्या आपल्याला बॉलिवूडमध्येच पाहायला मिळत आहे. केवळ बॉलिवूडमध्ये नव्हे तर मराठी चित्रपटसृष्टीतही आपल्याला तोच ट्रेंड पाहायला मिळतो. सचिन पिळगांवकर यांची मुलगी श्रिया, महेश कोठारे यांचा मुलगा आदिनाथ, विजय चव्हाण यांचा मुलगा वरद, निर्मिती सावंत यांचा मुलगा अभिनय, लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय आपल्याला आपल्या आई वडिलांप्रमाणेच याच क्षेत्रात करियर करताना दिसत आहेत आणि यातील अनेकांना या क्षेत्रात चांगले यश देखील मिळाले आहे.अशोक सराफ यांनी एक काळ गाजवला आहे. त्यांनी मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या हम पाच या मालिकेला तर प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्यांच्या अभिनयाचे, कॉमिक टायमिंगचे सगळेच कौतुक करतात. त्यांची पत्नी निवेदिता सराफ ही देखील खूप चांगली अभिनेत्री असून तिने अनेक चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. त्या आजही अनेक मालिकांमध्ये, नाटकांमध्ये खूप चांगल्या भूमिकांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का त्यांचा मुलगा अनिकेत सराफला अभिनयात अजिबातच रस नाहीये. अनिकेत काही वेळा त्याच्या आई वडिलांसोबत काही कार्यक्रमांना हजेरी नक्कीच लावतो. पण या क्षेत्राविषयी त्याला अजिबातच प्रेम नाहीये. त्याला रस आहे ते जेवण बनवण्यात. तो खूप चांगला शेफ असून तो पाश्चिमात्य पद्धतीचे जेवण खूपच छान बनवतो. युट्युबला निक सराफ या नावाने त्याचे जेवण बनवतानाचे अनेक व्हिडिओ देखील आहेत. त्याच्या या व्हिडिओला अनेकांनी लाइक केले आहे. तसेच या व्हिडिओंना खूप चांगले व्ह्यूज आहेत. Also Read : तुम्हाला माहीत आहे का चित्रपटसृष्टीत येण्याआधी बँकेत काम करायचे अशोक सराफ?