Join us
Daily Top 2Weekly Top 5

​आर्चीच्या चाहत्यांनी केला कराड-सोलापूर रस्त्यावर चक्का जाम !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2016 13:17 IST

अभिनेत्री रिंकू राजगुरु अर्थात ‘सैराट’ चित्रपटातील आर्चीची क्रेझ अद्याप कमी झालेली नाही. विट्यामध्ये एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी आलेल्या रिंकूला पाहण्यासाठी ...

अभिनेत्री रिंकू राजगुरु अर्थात ‘सैराट’ चित्रपटातील आर्चीची क्रेझ अद्याप कमी झालेली नाही. विट्यामध्ये एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी आलेल्या रिंकूला पाहण्यासाठी एकच गर्दी झाली. यामुळे कराड-सोलापूर रस्त्यावर चक्का जाम झाला. आचीर्ची एक झलक पाहण्यासाठी चाहते सैराट झाले आहेत. हे हॉटेल कराड-सोलापूर रस्त्यावर असल्याने हा रस्ताही गदीर्ने फुलून गेला. हा रस्ता बंद करुन वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. रिंकू राजगुरुला पाहण्यासाठी झालेली गर्दी आवरताना पोलिसांना कसरत करावी लागली.