Join us  

'इजिप्तमध्ये चित्रित झालेला हा आहे पहिला कोकणी चित्रपट, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2019 10:31 AM

'यशाला कधीच शॉर्टकट नसतो ', असा संदेश अधोरेखित करणारा हा चित्रपट मुलांसाठी आणि पालकांसाठी प्रेरणादायी चित्रपट ठरणार आहे .

पुणे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट चे पदवीधर असणारे बंगलोरचे डॉक्टर रमेश कामथ यांनी कोकणी भाषेतील 'जाना माना ' आणि 'आ वै जा सा ' हे यशस्वी चित्रपट दिले आहेत. 'बेटी बचाओ बेटी पढाओ ' या विषयावर आधारित 'अप्सरा धारा ' हा त्यांचा सध्याचा चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे .चित्रपटाची कथा ,पटकथा आणि दिग्दर्शन हे डॉक्टर रमेश कामथ यांचे आहे .

मंगलोर येथील मास्टर सार्थक शेणॉय आणि कुमारी स्वाती भट या गुणीबालकलाकारांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत . बंगलोर चे सुप्रसिद्ध व्यावसायिक उद्योजक आणि दानशूर असणारे डॉक्टर दयानंद पै यांनी या चित्रपटात 'दयानंद' ही एक खास भूमिका केली आहे . ''अप्सरा धारा ' हा  इजिप्त मध्ये चित्रित झालेला पहिला कोकणी चित्रपट आहे आणि यात काही थ्री डी दृश्येही चित्रित केली आहेत . 'यशाला कधीच शॉर्टकट नसतो ', असा संदेश अधोरेखित करणारा हा चित्रपट मुलांसाठी आणि पालकांसाठी प्रेरणादायी चित्रपट ठरणार आहे .

बहुभाषिक चित्रपट कलावंत गोपीनाथ भट हे या चित्रपटात ग्राम प्रमुखाची भूमिका करत आहेत आणि सुप्रसिद्ध नाट्यकलावंत पी रोहिदास नायक हे आदर्श शिक्षक 'पिंटो ' ही व्यक्तिरेखा साकारत आहेत . दगडाचे सोन्यात रूपांतर करणाऱ्या परिकथेचा रहस्यमय घटक सुद्धा या चित्रपटात तुम्हाला आनंद देणार आहे .

हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याआधीच या चित्रपटाची निवड कोलकता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील 'बाल चित्रपट 'विभागासाठी झाली आहे आणि हा चित्रपट बालदिनाच्या निमित्ताने १४ नोव्हेंबरला दाखवला जाणार आहे.