Join us
Daily Top 2Weekly Top 5

अंशुमन विचारेच्या चिमुकलीचा हा व्हिडिओ पाहा, तैमुरला विसरून जाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 12:34 IST

आपल्या विनोदाने सगळ्यांना हसवत ठेवणारा अभिनेता अंशुमन विचारे जेवढा लोकप्रिय आहे, तेवढीच लोकप्रिय त्याची मुलगी सुद्धा आहे.

ठळक मुद्देअंशुमनची मुलगी देखील आपले आवडते आइस्क्रीम खात असून त्याचसोबत आईसोबत गप्पा मारताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

बॉलिवूडमध्ये आज अनेक कलाकारांची मुलं जन्माला येताच तुफान पब्लिसिटी मिळवताना दिसतात. यात नवाब सैफ अली खानचा आणि करिना कपूरचा मुलगा तैमूर आघाडीवर आहे. या स्टार किडसनाही टक्कर देणारे मराठीतील स्टार किडसचे व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. लॉकडाऊनमध्ये मराठी कलाकारांच्या चिमुकल्यांनी सोशल मीडियावर अक्षरक्षः धुमाकुळ घातला होता. त्यांचे व्हिडीओ पाहून चाहतेही रिफ्रेश झाले होते. आता एका अभिनेत्याच्या मुलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

आपल्या विनोदाने सगळ्यांना हसवत ठेवणारा अभिनेता अंशुमन विचारे जेवढा लोकप्रिय आहे, तेवढीच लोकप्रिय त्याची मुलगी सुद्धा आहे. आणि सध्या त्याच्या मुलीचे असे मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर रसिकांची प्रचंड पसंती मिळवत आहेत.

सध्या अनेक ठिकाणी मॉल पुन्हा सुरू झाले आहेत. त्यामुळे अनेकजण मॉलमध्ये जाऊन शॉपिंग करत आहेत किंवा आपल्या आवडत्या पदार्थांवर यथेच्छ ताव मारत आहेत. अंशुमनची मुलगी देखील आपले आवडते आइस्क्रीम खात असून त्याचसोबत आईसोबत गप्पा मारताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तिचा हा व्हिडिओ आतापर्यंत ३८ हजार लोकांनी लाईक केला आहे तर ६३५ लोकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

एकांकिकांमधून घडलेला अंशुमन आज नाटक आणि सिनेमा क्षेत्रात उत्तम स्थिरावला आहे. 'श्वास', 'पोस्टर बॉईज', 'स्वराज्य', 'विठ्ठला शप्पथ' अशा अनेक मराठी सिनेमांंमध्ये अंशुमन विचारेने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. मोर्चा या सिनेमाद्वारे त्याने गायनाच्या क्षेत्रात देखील प्रवेश केलेला आहे.

टॅग्स :अंशुमन विचारे