Join us
Daily Top 2Weekly Top 5

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नव्या घराच्या चाव्या आल्या हाती, मराठी अभिनेता म्हणाला "तिसरं घर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 19:28 IST

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी अभिनेत्यानं घेतलं तिसरं नवीन घर, पोस्ट शेअर करीत व्यक्त केला आनंद

मराठी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेता आणि आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना हसवणारा अंशुमन विचारे (Anshuman Vichare) याच्यासाठी यंदाचा गुढीपाडवा अत्यंत खास ठरला आहे. नवीन वर्षाच्या मुहूर्तावर अंशुमन आणि त्याची पत्नी पल्लवी विचारे यांच्या हाती आपल्या स्वप्नातील नव्या घराच्या चाव्या आल्या आहेत. विशेष म्हणजे, हे त्यांच्या आयुष्यातील तिसरे घर असून, पल्लवीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपला आनंद व्यक्त केला आहे.

पल्लवी विचारेने घराचे फोटो शेअर केले आहेत. तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, "गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा! आजच्या या मंगल दिनी आमच्या आयुष्यात हे तिसरे घर आले आहे. हा आनंद आभाळभर आहे आणि तो तुम्हा सर्वांसोबत साजरा करण्यासाठी ही छोटीशी पोस्ट". या पोस्टवर चाहत्यांनी आणि मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

अंशुमन मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. आजवर त्याने अनेक गाजलेल्या सिनेमा, मालिकांमध्ये काम केलं आहे. फु बाई फु, कॉमेडीची बुलेट ट्रेन, घरोघरी, कानामागून आली, या मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे. तर,  संघर्ष, भरत आला परत, मिसळ पाव, सूर राहू दे, शिनमा, परतू, पोश्टर बॉईज, वेड लावी जिवा या सिनेमांमध्येही तो झळकला आहे.   अंशुमनच्या या यशामागे त्याची पत्नी पल्लवी खंबीरपणे उभी राहिली आहे. अंशुमन आणि पल्लवी हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. त्यांच्या या 'गुड न्यूज' मुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Anshuman Vichare buys new house on Gudi Padwa, calls it third.

Web Summary : Actor Anshuman Vichare and his wife, Pallavi, celebrated Gudi Padwa by acquiring their third home. Pallavi shared photos on social media, expressing their joy. Fans and colleagues congratulated the couple. Anshuman is known for his roles in Marathi cinema and television.
टॅग्स :अंशुमन विचारे