Join us

पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 17:07 IST

'P.S.I. अर्जुन' या सिनेमाचा नुकताच ट्रेलर लाँच पार पडला. यावेळी अंकुश चौधरीने माध्यमांशी संवाद साधला

मराठी अभिनेताअंकुश चौधरी (Ankush Chaudhari) आगामी 'P.S.I अर्जुन' या सिनेमात दिसणार आहे. यामध्ये त्याचा डॅशिंग अवतार पाहायला मिळणार आहे. सिनेमात तो पोलिस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत आहे. पोलिसाच्या वर्दीतील त्याचा फोटोही मध्ये व्हायरल झाला. तसंच सिनेमचाचा टीझरही लोकांना सध्या चर्चेत आहे. अंकुशला या लूकमध्ये पाहून त्याच्या लेकाची काय प्रतिक्रिया होती वाचा.

'P.S.I. अर्जुन' या सिनेमाचा नुकताच ट्रेलर लाँच पार पडला. यावेळी अंकुश चौधरीने माध्यमांशी संवाद साधला. पोलिस अवतारातील लूक पाहून मुलाची काय प्रतिक्रिया होती यावर अंकुश म्हणाला, "तुम्ही हसाल..पण एक दिवस मी त्याला सिनेमाचे फोटो वगरे दाखवले. त्याने माझ्याकडे इन्स्पेक्टरचा ड्रेस हवा अशी मागणी केली. मला कळलंच नाही...मी दीपालाही विचारलं की याला काय हवंय? तर त्याला इन्स्पेक्टरचा युनिफॉर्म हवा होता. तो त्याला घालायचा होता. आम्ही त्याच्या मापाचा ड्रेस शिवून घेतला. यानंतर तो ते घालून बिल्डिंगमध्ये दिवसभर फिरत होता. दुसऱ्या दिवशी काढला आणि आता तसाच पडून आहे. पण तेव्हा त्याच्या डोक्यात ते का केलं मला अजूनही कळलं नाही. पण ही चांगली गोष्ट आहे की त्यालाही आपल्या पोलिस बांधवांबाबत काहीतरी वाटतं."

"लहानपणापासून मला इन्स्पेक्टर व्हायची इच्छा होती. कोणीतरी मला सॅल्युट ठोकेल असं मला वाटायचं. वर्दी घालण्याची माझी इच्छा पूर्ण झाली. कारण ती अंगावर चढवली की आपण कोणाचंतरी संरक्षण करणार आहे असा एक वेगळाच आत्मविश्वास येतो. ही गंमत मला सिनेमाच्या माध्यमातून अनुभवायला मिळाली."

 येत्या ९ मे रोजी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अंकुश चौधरीचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळणार आहे. भूषण पटेल यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून अंकुशसोबत सिनेमात अक्षया हिंदळकर, किशोर कदम, नंदू माधव, राजेंद्र शिसाटकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

टॅग्स :अंकुश चौधरीमराठी अभिनेतामराठी चित्रपट