Join us

& जरा हटके कथा जरी कॉमन असली तरी विषय मात्र हटके

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2016 13:52 IST

'प्रेम करावे पण जरा हटके' उपशीर्षकावरून बरेच काही सांगून जाणाºया & जरा हटके कथा जरी कॉमन असली तरी विषय ...

'प्रेम करावे पण जरा हटके' उपशीर्षकावरून बरेच काही सांगून जाणाºया & जरा हटके कथा जरी कॉमन असली तरी विषय मात्र हटके आहे. मिताली जोशी लिखित या चित्रपटात आपल्या मध्यमवयाच्या स्त्री पुरुषाच्या नात्याची कथा  मांडण्यात आली आहे. मध्यमवयात एकमेकांना साथ देण्यासाठी पुन्हा लग्नाचा निर्णय घेतात, त्यांच्या या निर्णयाला त्यांची मुलं  कितपत स्वीकारतात. त्यातून नात्यांमध्ये वाढत जाणारी गुंतागुंत आणि या सगळ्याचा त्यांच्यावर होणार परिणाम याचे चित्रण याचित्रपटात करण्यात आले आहेत. मृणाल कुलकर्णी, इंद्रनील सेनगुप्ता, सोनाली खरे, स्पृहा जोशी, सिद्धार्थ मेनन आणि शिवानी रंगोले यांच्या प्रमुख भूमिका आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश कुंटे यांनी केले आहे. तर इरॉस इंटरनॅशनल या कंपनीच्या निर्मात्या कृषिका लुल्ला आणि रवी जाधव या दोघांनी मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट २२ जुलैला प्रदर्शित होणार आहे.