कोणाला भेटून तेजश्री प्रधानला झाला आनंद?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2017 17:17 IST
तेजश्री प्रधान होणार सून मी या घरची या मालिकेमुळे नावारूपाला आली. या मालिकेत तिने साकारलेली जान्हवी ही भूमिका प्रचंड ...
कोणाला भेटून तेजश्री प्रधानला झाला आनंद?
तेजश्री प्रधान होणार सून मी या घरची या मालिकेमुळे नावारूपाला आली. या मालिकेत तिने साकारलेली जान्हवी ही भूमिका प्रचंड गाजली होती. आजही प्रेक्षकांना तिची ही भूमिका चांगलीच लक्षात आहे. या मालिकेनंतर ती सध्या काय करते या चित्रपटात झळकली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. या चित्रपटाची कथा, या चित्रपटातील व्यक्तिरेखा प्रेक्षकांना चांगल्याच भावल्या होत्या. या चित्रपटात अभिनय बेर्डे, अंकुश चौधरी, आर्या आंबेकर आणि तेजश्री प्रधान यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. त्या सगळ्यांनी आपल्या अभिनयाने या चित्रपटाला चार चाँद लावले.ती सध्या काय करते या चित्रपटात आपल्याला नायक-नायिकेचे बालपण आणि त्यानंतर त्यांचे तरुणपणातील आयुष्य पाहायला मिळाले होते. या चित्रपटात मध्यांतरानंतर या चित्रपटातील नायिका म्हणजेच तन्वीला मुलगी असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले होते. या मुलीचे नाव रेवा होते. या चित्रपटात तन्वीची व्यक्तिरेखा तेजश्रीने साकारली होती. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान तेजश्री आणि या चित्रपटात रेवाची व्यक्तिरेखा साकारत असलेल्या गोंडस मुलीची खूपच छान गट्टी जमली होती. नुकतीच तेजश्री रेवाला भेटली होती आणि तिला भेटून तेजश्रीला प्रचंड आनंद झाला होता. तिला भेटल्यानंतर तेजश्रीने तिच्यासोबतचा एक खूप गोड फोटो फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटला पोस्ट केला आहे आणि या फोटोसोबत एक पोस्ट लिहिली आहे. त्यात तिने म्हटले आहे की, त्यामध्ये तुम्ही हिला ओळखलंत का? ही ती सध्या काय करतेमधली रेवा आहे. मी तिला लिटिल आइस्टन अशी हाक मारले. मी तिला अखेर अनेक दिवसांनी भेटली. तिला भेटून मला प्रचंड आनंद झाला आहे