Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमृता खानविलकरचा हा मराठमोळा लूक तुम्हालाही करेल घायाळ,सोशल मीडियावर फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 11:13 IST

मराठमोळ्या या अवतारात झोपाळ्यावर बसलेला हा फोटो अमृताने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोवर अमृताच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होतोय. 

अमृता खानविलकर फक्त मराठीच नाहीतर बॉलिवूडमध्येही तिने स्वतःला सिद्ध केले आहे.मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही अमृताने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. मराठी आणि हिंदी सिनेमांसह रिअॅलिटी शो तसंच काही शोचं सूत्रसंचालनही तिने केले.बहुतांशी वेळी अमृता रसिकांना मॉडर्न अवतारात पाहायला मिळाली. मग ते सिनेमा असो किंवा रिल लाईफ. तिची ड्रेसिंग स्टाईल अनेकदा वेस्टर्न पद्धतीची असल्याचे अनेकदा पाहायला मिळतं. मात्र अमृताचा एक मराठमोळा हटके लूक समोर आला आहे. यांत अमृताचं सौंदर्य आणखी खुलून गेल्याचे दिसून येत आहे. मराठमोळ्या पद्धतीने नेसलेली पारंपरिक मराठी साडी, गळ्यात मोठं मंगळसूत्र, दागिने, नाकात नथ, पेहरावास साजेशी अशी केशरचना या सगळ्यामुळे अमृताचे सौंदर्य खुलून गेले आहे. मराठमोळ्या या अवतारात झोपाळ्यावर बसलेला हा फोटो अमृताने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोवर अमृताच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होतोय. 

आगामी काळात मराठी सिनेमासोबतच काही हिंदी सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहेत.बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमात झळकलेली अमृता आता पुन्हा एका नवीन सिनेमात वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. मेघना गुलझार दिग्दर्शित ‘राझी’ या चित्रपटात अमृताने पाकिस्तानी आर्मीची पत्नी ‘मुनिरा’ आणि त्यानंतर ‘डॅमेज’ या वेब सिरीजमधील ‘लोव्हीना’ हे सिरीयल किलरचे पात्रं साकारले. या सर्व पात्रांच्या सादरीकरणानंतर अमृता ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटाच्या माध्यमातून भारतीय पोलिसाची पत्नी ‘सरिता’ हे पात्र साकारुन प्रेक्षकांना पुन्हा एकदा सरप्राईज करण्यासाठी सज्ज झाली आहे.

मिलाप झवेरी दिग्दर्शित ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटात अमृता अभिनेते मनोज बाजपेयी यांच्या पत्नीची म्हणजेच सरिताची भूमिका साकारत आहे. अमृतासाठी सरिताची भूमिका ही अगदी सोपी होती,यासाठी तिला विशेष असे कष्ट घ्यावे लागले नाही. कारण ख-या आयुष्यात जसा अमृताचा स्वभाव आहे अगदी तसाच हुबेहूब सरिताचा आहे. जसे की आपली अमृता जशी खोडकर, मस्तीखोर, प्रेमळ तशीच सरिता देखील आहे. विशेष म्हणजे काय बरोबर, काय चूक याची योग्य जाणीव जशी अमृताला आहे तशीच सरिताला पण आहे.या चित्रपटाच्या आणि भूमिकेच्या निमित्ताने अमृताचा खरा स्वभाव आणि तिचे विचार या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळेल.