Amruta Khanvilkar : मराठी सिनेजगतात लावणीप्रधान सिनेमांचा एक तगडा फॅनबेस आहे. गाजलेल्या लावण्यांमध्ये एक लावणी जगभर प्रसिद्ध आहे, ती म्हणजे 'मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा...'. संगीतकार अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेली, गुरू ठाकूर यांच्या लेखणीतून अवतरलेली आणि बेला शेंडेंच्या आवाजातील ही लावणी प्रचंड गाजली. 'नटरंग' या मराठी चित्रपटातील या लावणीवर मराठी कलाविश्वाची 'चंद्रमुखी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमृता खानविलकरने अफलातून नृत्य सादर करून लाखो प्रेक्षकांचे मन जिंकले होते. आजही हे गाणे ऐकताच सर्वांना अमृताची आठवण येते. पण, तुम्हाला माहितीये का? या लावणीसाठी अमृताला किती मानधन मिळालं होतं?.
नुकत्याच 'व्हरायटी इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत अमृताने या गाण्याच्या शूटिंगचा अनुभव आणि तिला मिळालेल्या मानधनाबद्दल खुलासा केला आहे. अमृता म्हणाली, "आम्ही हे गाणं दोन रात्रीत शूट केलं होतं. हे गाणं तू करशील का? असं विचारण्यासाठी मला रात्री दहा वाजता फोन आला होता आणि मी सुद्धा त्यांना 'हो' म्हटलं होतं. मला या गाण्यासाठी तेव्हा ३० हजार रुपये मानधन मिळालं होतं".
मानधनापेक्षा या गाण्याने दिलेल्या लोकप्रियतेबद्दल अमृता अधिक भरभरून बोलली. ती म्हणाली, एक गोष्ट मी आवर्जून सांगेन, या गाण्यामुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदललं. मी अशा ठिकाणीही परफॉर्म केलं आहे, जिथे वीज नव्हती, तरीही लोक फक्त हा डान्स पाहण्यासाठी गर्दी करायचे. अगदी १० दिवसांपूर्वी 'Nucleya' च्या कॉन्सर्टमध्येही हे गाणं वाजलं, यावरूनच त्याची जागतिक क्रेझ लक्षात येते". १० हजार लोकांसमोर परफॉर्म करण्याची संधी याच गाण्यामुळे मिळाल्याचे तिने नमूद केले.
अनेकजण अमृताच्या ऊर्जेचं कौतुक करतात, त्यावर भाष्य करताना ती म्हणाली, "मी कोणतीही प्रोफेशनल ट्रेंड डान्सर नाहीये. मी नेहमी माझ्या दिग्दर्शकाचं आणि कोरिओग्राफरचं ऐकते. अनेक लोक विचारतात तुझी एनर्जी कमाल आहे, ती कधीच कमी होत नाही. माझी डान्समधील एनर्जी ही सर्व देवाची कृपा आणि त्याचं वरदान आहे".
Web Summary : Amruta Khanvilkar disclosed she earned ₹30,000 for the iconic 'Vajle Ki Bara' lavani. She emphasized the song's transformative impact on her career, leading to widespread recognition and performance opportunities worldwide, highlighting its enduring popularity.
Web Summary : अमृता खानविलकर ने बताया कि उन्होंने प्रतिष्ठित 'वाजले की बारा' लावणी के लिए ₹30,000 कमाए। उन्होंने अपने करियर पर गाने के परिवर्तनकारी प्रभाव पर जोर दिया, जिससे व्यापक पहचान और दुनिया भर में प्रदर्शन के अवसर मिले, और इसकी स्थायी लोकप्रियता पर प्रकाश डाला।