Join us
Daily Top 2Weekly Top 5

"चंद्रमुखी सुपरहिट झाला पण पुढे हातात काम नव्हतं...", अमृता खानविलकरने पहिल्यांदाच केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 14:52 IST

चंद्रमुखी या सिनेमाने अमृताची सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण झाली. या सिनेमात अमृताने साकारलेली चंद्रमुखी प्रचंड गाजली. मात्र या सिनेमानंतर अमृता दोन वर्ष एकटी पडली होती. तिच्या हातात काम नव्हतं असा खुलासा तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केला आहे. 

अमृता खानविलकर ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री. मराठीसोबतच अमृताने तिच्या अभिनयाने बॉलिवूडही गाजवलं आहे. 'कट्यार काळजात घुसली', 'हर हर महादेव', 'साडे माडे तीन', 'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' अशा अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये तिने काम केलं. मात्र चंद्रमुखी या सिनेमाने अमृताची सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण झाली. या सिनेमात अमृताने साकारलेली चंद्रमुखी प्रचंड गाजली. मात्र या सिनेमानंतर अमृता दोन वर्ष एकटी पडली होती. तिच्या हातात काम नव्हतं असा खुलासा तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केला आहे. 

अमृताने महाराष्ट्र टाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने 'चंद्रमुखी' सिनेमानंतर अनुभवलेल्या परिस्थितीबद्दल भाष्य केलं. ती म्हणाली, "'चंद्रमुखी' नंतर दोन वर्ष मी एकटी पडले होते. एवढा सुपरहिट सिनेमा दिल्यानंतर माझ्याकडे विविध प्रोजेक्टसची रांग लागली असेल, असं वाटणं स्वाभाविक होतं. पण मला कोणत्या प्रकारच्या भूमिकेबद्दल विचारावं हेच सिनेसृष्टीतल्या लोकांना कळत नव्हतं. त्यामुळे ती दोन वर्ष कोणताही प्रोजेक्ट हातात नव्हता. त्या काळात मराठी सिनेसृष्टीतून काहीच विचारणा झाली नाही. मग अशा परिस्थितीत निर्मितीची सूत्र हातात घेऊन उतरावं लागतं. आता नेहा पेंडसे हिचंच उदाहरण आहे. 'तिघी' नावाच्या सिनेमाची तीच निर्माती आहे आणि ती त्यात काम करत आहे. मराठी सिनेसृष्टीतून म्हणावं तसं काम येतच नाहीये".

अमृता सध्या तिच्या 'तस्करी' या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. या वेब सीरिजमध्ये अमृताने इमरान हाशमी सोबत स्क्रीन शेअर केली आहे. 'तस्करी'मध्ये अमृता कस्टम ऑफिसरच्या भूमिकेत आहे. याशिवाय 'राझी', 'हिंमतवाला', 'रंगून','सत्यमेव जयते' अशा हिंदी सिनेमांमध्येही तिने काम केलं आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Amruta Khanvilkar reveals post-Chandramukhi struggles: No work for two years.

Web Summary : Amruta Khanvilkar, after the success of 'Chandramukhi,' faced a two-year period without work. Despite the film's success, she struggled to find suitable roles. Now she is working with Emraan Hashmi in Taskari.
टॅग्स :अमृता खानविलकर