Join us
Daily Top 2Weekly Top 5

माय गर्ल म्हणत अमृता खानविलकरने शेअर केला गोंडस बाळासोबतचा फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 19:14 IST

अमृता खानविलकरने एका गोंडस बाळासोबतचा फोटो पोस्ट केला असून त्यासोबत मी अँड माय गर्ल असे कॅप्शन लिहिले आहे.

ठळक मुद्देहे गोंडस बाळ अमृताची भाची असून अमू आणि चिऊ असा हॅशटॅगदेखील तिने दिला आहे. अमृताने हा फोटो शेअर करून केवळ आठ तास झाले असले तरी 62 हजाराहून अधिक लोकांनी या फोटोला लाईक केले आहे. 

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरने सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने रसिकांवर मोहिनी घातली आहे. अमृताचे फॅन्स तिच्या डान्ससोबतच अदा आणि स्टाईलवर फिदा असतात. मराठीसह हिंदी सिनेमातही आपलं नृत्य आणि अभिनयाची जादू अमृताने दाखवली आहे. अमृताने तिचा एक नुकताच फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून या फोटोची सगळीकडे चर्चा रंगली आहे.

अमृता खानविलकरने एका गोंडस बाळासोबतचा फोटो पोस्ट केला असून त्यासोबत मी अँड माय गर्ल असे कॅप्शन लिहिले आहे. हे गोंडस बाळ अमृताची भाची असून अमू आणि चिऊ असा हॅशटॅगदेखील तिने दिला आहे. अमृताने हा फोटो शेअर करून केवळ आठ तास झाले असले तरी 62 हजाराहून अधिक लोकांनी या फोटोला लाईक केले आहे. 

सुरुवातीला एक डान्सर म्हणून प्रसिद्ध असलेली अमृता आता मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. राजी', 'सत्यमेव जयते' , 'मलंग' अशा सिनेमांतून तिने हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली आहेत. लवकरच अमृता पॉन्डेचेरी या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. सचिन कुंडलकर या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. कुंडलकर आणि तेजस मोडकने या सिनेमाची कथा लिहिली आहे.

टॅग्स :अमृता खानविलकर