Join us

सूर्यनमस्कारावरुन अमृता खानविलकरने ठेवलं नवीन घराचं नाव, म्हणाली- "छोटसं क्युट घर घेतलं आणि मग..."

By तेजल गावडे. | Updated: April 4, 2025 13:16 IST

Amruta Khanvilkar : अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या 'सुशीला-सुजीत' सिनेमातील आयटम साँग चिऊताई चिऊताई दार उघडमुळे चर्चेत आहे. सगळीकडे या गाण्याची क्रेझ पाहायला मिळत आहे.

अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) सतत चर्चेत आहे. सध्या ती 'सुशीला-सुजीत' सिनेमातील आयटम साँग चिऊताई चिऊताई दार उघडमुळे चर्चेत आहे. सगळीकडे या गाण्याची क्रेझ पाहायला मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी अमृता नवीन घरात शिफ्ट झाली आहे. तिने तिच्या घराचं नाव 'एकम' ठेवलंय. हे नाव तिला कसं सुचलं याबद्दल तिने लोकमत सखीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. इतकंच नाही तर यावेळी तिने तिच्या स्पेशल नंबरबद्दल सांगितलं.

अमृता खानविलकर म्हणाली की, माझ्या फ्लॅटची अखंड टोटल ही एक येते. त्यामुळे एक हा नंबर माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. म्हणजे मी एका रेंटेड अपार्टमेंटमध्ये राहत होते आणि मला आठवतं त्याचा नंबर ७०३ होता. तिथे राहत असताना मला 'वाजले की बारा' हे गाणं मिळालं होतं. ते ते घर माझ्यासाठी अत्यंत आयुष्य बदलणारं घर होतं आणि मी कुठेही गेली की तिथे नंबर पाहिल्यानंतर माझ्या मनात त्याची टोटल किती असेल, असे पाहावेसे वाटते. ओके करून बघूयात आणि सुदैवाने असं झालं की आटपशीर छोटसं क्युट घर घेतलं मी आणि मग त्याची टोटल एक आली.

ती पुढे म्हणाली की, मी योगा करते. मी एक सर्टिफाइड योगा टीचर आहे त्याच्यामुळे मी मॅटवर असताना मी विचार करत होते की, प्लॅट नंबर वगैरे सगळं ठीक आहे पण आता आपण बंगला तर काही घेऊ शकत नाही. अगदी त्याला बंगल्याचं नाव वगैरे द्यायला तर आता आपण हे घर घेतलंय तर त्याला पण एक छोटसं नाव देऊयात तर काय नाव असू शकतं आणि आमच्या सूर्यनमस्कारमध्ये आपण जेव्हा हात वर करतो तेव्हा त्याला 'एकम' असं म्हटलं जातं. मी म्हटलं हे छान आहे आणि हे मला मॅटवर सुचलेलं नाव आहे आणि 'एकम' असं मी ते नाव दिलं त्याला ज्याची खरंतर टोटल एकच आहे.

टॅग्स :अमृता खानविलकर