मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी आपल्या अभिनयाने आणि नृत्याने गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या दोन वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. एकीकडे तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘तस्करी: द स्मगलर्स’ या वेब सीरिजमधील ॲक्शनची चर्चा असताना, दुसरीकडे तिने आपल्या खासगी आयुष्यातील एका गोष्टीबद्दल खुलासा केला आहे.
अमृताने नुकतीच 'नवशक्ती'ला एक मुलाखत दिली, ज्यामध्ये तिने ती कोणाला घाबरते यावर सडेतोड भाष्य केले. अमृता म्हणाली, "मी माझ्या आईला खूप घाबरते. त्यामुळे तिच्या 'डिपार्टमेंट'मध्ये मी कधीच ढवळाढवळ करत नाही. मग ते भाजी आणणं असो किंवा किचनमधील कामं असो".
अमृता खानविलकरने पुढे एक मजेशीर किस्सा सांगितला की, जर कधी रात्री उशिरा भूक लागली, तरी ती स्वतः स्वयंपाकघरात न जाता आईला फोन करून विचारते. मग तिची आई तिला सांगते कुठे काय ठेवले आहे. "वेब सीरिजमध्ये मी मिताली कामतची भूमिका साकारली असली, तरी माझ्या रिअल लाईफमधील 'मिताली कामत' (धाक असणारी व्यक्ती) ही माझी आईच आहे" असे तिने हसत हसत सांगितले.
ओटीटीवर अमृताचा ‘ॲक्शन’ मोडअमृता सध्या नेटफ्लिक्सवरील ‘तस्करी: द स्मगलर्स’ या वेब सीरिजमुळे यशाच्या शिखरावर आहे. १४ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या या सीरिजमध्ये तिने 'मिताली कामत' ही भूमिका साकारली असून तिने केलेले चित्तथरारक ॲक्शन सीक्वेन्स पाहून प्रेक्षक थक्क झाले आहेत. या सीरिजमध्ये तिच्यासोबत इमरान हाश्मी, शरद केळकर आणि नंदिश संधू यांसारखे तगडे कलाकार आहेत.
रंगभूमीवर स्वप्नील जोशीसोबत जमली जोडीकेवळ ओटीटीच नव्हे, तर अमृता सध्या रंगभूमीवरही प्रेक्षकांची मने जिंकत आहे. 'लग्नपंचमी' या नाटकात ती अभिनेता स्वप्नील जोशीसोबत प्रमुख भूमिकेत दिसत आहे. निपुण धर्माधिकारी यांचे दिग्दर्शन आणि मधुगंधा कुलकर्णी यांच्या लेखणीतून उतरलेल्या या नाटकाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
Web Summary : Amruta Khanvilkar fears her mother, avoiding her 'department' like kitchen duties. Despite action roles, mom's the real boss. She's acting in 'Lagna Panchami' with Swwapnil Joshi and her web series 'Taskari: The Smugglers' is a hit.
Web Summary : अमृता खानविलकर को अपनी माँ से डर लगता है, रसोई के काम जैसे उनके 'विभाग' से बचती हैं। एक्शन भूमिकाओं के बावजूद, माँ ही असली बॉस हैं। वह स्वप्नील जोशी के साथ 'लग्ना पंचमी' में अभिनय कर रही हैं और उनकी वेब सीरीज 'तस्करी: द स्मगलर्स' हिट है।