Join us

अमृता खानविलकरचा हॉट फोटो तुम्ही पाहिला का? हटणार नाही तुमची नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2019 17:05 IST

अमृता खानविलकर नेहमीच तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावतात. त्यामुळे यावेळीही तिच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून भरपूर लाईक्स आणि कमेंटस मिळत असल्याचे पाहायला मिळते आहे.

मराठी सिनेसृष्ट्रीत पूर्वीच्या काळात लूक आणि सौंदर्याबाबत तितकेसे प्रयोग केले जात नव्हते. मात्र आता या अभिनेत्री आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत आधीपेक्षा जास्त सजग झाल्या आहेत. त्यामुळेच त्या आधीपेक्षा अधिक बोल्ड आणि ग्लॅमरस दिसू लागल्या आहेत. मराठी अभिनेत्रींच्या करिअरच्या सुरूवातीच्या फोटों आणि सध्याचे फोटोंवर नजर टाकली तर त्यांच्या लूकमध्ये झालेला हा बदल सहजच कुणालाही लक्षात येईल. याच यादीत सगळ्यात जास्त ग्लॅमरस मराठमोळी अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकर ओळखली जात आहे.  

नुकतेच एका फिल्मफेअर स्टाइल अवॉर्डमध्ये अमृताने हजेरी लावली होती.यावेळी स्टायलिश अंदाजात अमृताने रेड कार्पेटवर एंट्री घेताच सा-यांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या होत्या. याच अवॉर्ड सोहळ्यातील काही खास फोटो तिने  सोशल मीडियावर शेअर केले आहेत. नेहमीच तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावतात. त्यामुळे यावेळीही  तिच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून भरपूर लाईक्स आणि कमेंटस मिळत असल्याचे पाहायला मिळते आहे. तुर्तास तिचे  सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे.

सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील. सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर इतर अभिनेत्रींप्रमाणे अमृताचाच बोलबाला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

टॅग्स :अमृता खानविलकर