Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमृता खानविलकर होणार मावशी,मोठ्या बहिणीच्या ‘डोहाळे जेवणा'चा फोटो शेअर करून व्यक्त केला आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 08:00 IST

शेअर केलेल्या फोटोत येणा-या नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी सारेच आतुर असल्याचे पाहायला मिळत आहे.

“चांदण्यात न्या गं तिला, नटवा सजवा तिला, झोपाळे झुलवा भोवताली बसा तिच्या, काय हवं पुसा तिला, डोहाळे पुरवा कोणी तरी येणार येणार गं....”याच गाण्याच्या ओळी  सा-यांच्या ओठावर सहज रेंगाळू लागल्या. कारण निमित्त थोडं खास होतं. अभिनेत्री अमृता खानविलकर हिच्या घरी लवकरच नवीन पाहुणा येणार आहे. अमृताची मोठी बहीण आदिती खानविलकर-बक्षी हिच्याकडे गोड बातमी असून नुकतेच आदितीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. स्वतः अमृताने आईवडील आणि बहिणीसोबतचा डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमातील एक खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर करुन ही गोड बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.आदितीला आशीर्वाद देण्यासाठी सारेच उपस्थित होते. आदितीने दीपक बक्षीसोबत लग्न केले असून व्यवसायाने आदिती एक एअर होस्टेस आहे. आदिती दुबईत राहते.शेअर केलेल्या फोटोत येणा-या नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी सारेच आतुर असल्याचे पाहायला मिळत आहे.

मराठी रसिकांना आपल्या अभिनयाने आणि नृत्याने अक्षरक्षः वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. फक्त मराठीच नाही तर बॉलिवूडमध्येही तिने स्वतःला सिद्ध केले आहे. अमृता तिच्या चाहत्यांसाठी इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर नेहमीच फोटो पोस्ट करत असते. या फोटोंना प्रेक्षक नेहमीच भरभरून प्रतिसाद देतात. फक्त मराठीच नाही तर बॉलिवूडमध्येही तिने स्वतःला सिद्ध केले आहे. अमृता तिच्या चाहत्यांसाठी इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर नेहमीच फोटो पोस्ट करत असते. या फोटोंना प्रेक्षक नेहमीच भरभरून प्रतिसाद देतात. आमृताला हिंदी सिनेमांची लॉटरीच लागली आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.नवीन सिनेमात अमृता मनोज बाजपेयी आणि जॉन अब्राहमसह झळकणार आहे. दिग्दर्शक निखिल अडवाणी या सिनेमाची निर्मिती करणार आहे.तसेच "एक व्हिलन" ह्या चित्रपटाचा लेखक मिलाप झवेरी हा सिनेमा दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे.जॉन अब्राहम, मनोज बाजपेयी आणि अमृता ह्यांच्या नवीन हिंदी सिनेमाच्या घोषणेमुळे अमृताच्या चाहत्यांमध्ये वेगळाच उत्साह निर्माण झालेला दिसत आहे. डार्क अॅक्शन थ्रिलर अशा थाटणीचा हा सिनेमा असून त्यात अमृताची काय भूमिका असेल ह्याचीच उत्सुकता तिच्या चाहत्यांमध्ये पाहायला मिळत आहे.