Join us

अमृता खानविलकरने निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन योग दिवस केला साजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 13:34 IST

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर जगभरात कुठेही फिरत असली तरी दिवसाची सुरुवात योग करून ती करते आणि यंदाचा आंतरराष्ट्रीय योग दिवस अमृताने एका खास ठिकाणी साजरा केला आहे.

दररोजच्या धावपळीच्या जीवनात फिट राहणं हे सगळ्यासाठी महत्वाचं आहे आणि अनेक कलाकार देखील फिट राहण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करताना दिसतात. अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) फिट राहण्यासाठी योग करताना दिसते आणि तिच्या आयुष्यात योगाच खूप महत्त्व आहे, हे आजवर तिने अनेक मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. 

जगभरात कुठेही ती फिरत असली तरी दिवसाची सुरुवात योग करून ती करते आणि यंदाचा आंतरराष्ट्रीय योग दिवस अमृताने एका खास ठिकाणी साजरा केला आहे. योगायोग म्हणजे अमृताची केदारनाथ ट्रीप आणि हा योग दिवस यांचा उत्तम योग जुळून आला असं म्हणणं वावग ठरणार नाही. केदारनाथचे दर्शन घेऊन अमृताने हा योग दिवस अगदीच वेगळ्या पद्धतीने साजरा केला आहे. 

"योग म्हणजे फक्त शरीराची हालचाल नाही तर''

योग दिवस आणि केदारनाथ मंदिरात जाऊन घेतलेलं दर्शन याबद्दल अमृता खानविलकर म्हणाली की, गेल्या काही वर्षांत योगाचा सराव करताना एक गोष्ट माझ्या मनात खोलवर उतरली आहे ती म्हणजे "योग म्हणजे फक्त शरीराची हालचाल नाही तर मनाची स्थिरता देखील आहे." शांतता आपल्याला अधिक समजूतदार बनवते. आपले निर्णय घ्यायला आणि ते स्वीकारायला शिकवते आणि जे आपल्याला पुढे नेत नाही, त्याला सौम्यतेने सोडून द्यायचं धैर्य देते. यंदा मात्र मनात वेगळीच ओढ होती…दैनंदिन सराव जितका महत्त्वाचा आहे, तितकंच अधूनमधून सर्व काही बाजूला सारून स्वतःसाठी एखादा अनुभव शोधायला निघणंही आवश्यक असतं. एक असा अनुभव जो आपल्याला अधिक खोलवर रुजवतो आणि माझ्यासाठी हा अनुभव म्हणजे केदारनाथ यात्रा ! 

''प्रत्येकासाठी केदारनाथ वेगळं असतं''

तिने पुढे सांगितले, केदारनाथ यात्रेत खरी जादू तेव्हा घडली सकाळी साडेतीन वाजता, ब्रह्ममुहूर्तावर आम्हाला केदारनाथ मंदिरात दर्शन मिळालं! बाहेर येऊन योगासन करत हा सुंदर क्षण अनुभवायला मिळणं अगदीच स्वप्नवत होतं. प्रत्येकासाठी केदारनाथ वेगळं असतं. प्रत्येकाला भेटतो तिथे आपलाच एखादा जादुई क्षण. माझा क्षण मला मिळाला. आता तो क्षण मी माझ्यासोबत घेऊन परतले आहे माझ्या श्वासात, माझ्या साधनेत आणि माझ्या प्रत्येक शांत अस्तित्वात."

टॅग्स :अमृता खानविलकरकेदारनाथ