Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमृताचे बहिण प्रेम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2016 18:51 IST

नुकताच रक्षाबंधन हा सण मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी सर्व कलाकारांनी सोशलमिडीयावर भाऊ - बहिण यांचे फोटो ...

नुकताच रक्षाबंधन हा सण मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी सर्व कलाकारांनी सोशलमिडीयावर भाऊ - बहिण यांचे फोटो सोशलमिडीयावर टाकून रक्षाबंधन हा सण धूमधडाक्यात साजरा केला. तसेच यातील बरेच भाऊ-बहिण किवा बहिणी-बहिणी चित्रपटसृष्टीत दिसत असतात. पण अभिनेत्री अमृता खानविलकरची बहिण नेहमीच कॅमेरापासून तसेच या चंदेरी दुनियेपासून दूर राहिली आहे. पण रक्षाबंधन या सणाच्यानिमित्ताने अमृताची लाडकी बहिण आदिती ही कॅमेरासमोर आली आहे. त्यांचा एक झक्कास फोटो सोशलमिडीयावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्य बहिणींचे प्रेम अधिक दृढ दिसत आहे. यामध्ये दोघी बहिणींनी लाल रंगाचा वन पीस परिधान केला आहे. दोघी ही एकदम कूल दिसत आहे.