Join us

म्हणून खिलाडी कुमार ने घेतली 'पळशीची पीटी' च्या दिग्दर्शकांची भेट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 10:01 IST

पी. टी. उषा यांच्या जीवनावर सिनेमा आधारित असल्याच्या चर्चा सध्या जोर धरत आहेत. मात्र हा सिनेमा  पी.टी. उषा यांच्या जीवनावर आधारित असल्याचे कोणत्याही प्रकारची माहिती सिनेमाच्या टीमकडून देण्यात आलेली नाही. 

फ्रान्समध्ये होणा-या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात राज्य शासनाकडून 'पळशीची पी.टी.' या चित्रपटाची निवड करण्यात आली होती. हा चित्रपट मुळचा साता-याचा म्हणजेच साता-यातील पळशी गावातला. 'कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात' निवड झाल्यामुळे 'पळशीची पी.टी.' चे कौतुक संपूर्ण साता-यात होत होते आणि योगायोगाने त्याच दरम्यान साता-यामध्ये अभिनेते अक्षय कुमार आगामी हिंदी 'केसरी' चित्रपटाचे शूट करत होता. 'पळशीची पी.टी.' चे कौतुक त्यांच्याही कानावर पडले आणि कुतुहल म्हणून काय आहे 'पळशीची पी.टी.' हे जाणून घेण्यासाठी अक्षय कुमारने या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते धोंडिबा कारंडे यांना 'केसरी'च्या सेटवर बोलवून त्यांची भेट घेतली. 

या भेटीनंतर 'पळशीची पी.टी.' ची कथा आणि सर्वांनी मिळून या चित्रपटाला एक कलाकृती म्हणून कसं तयार केलं, त्यासाठी घेतलेली मेहनत जाणून घेतल्यावर अक्षय कुमारने देखील 'पळशीची पी.टी.'चे मनापासून कौतुक केले आणि चित्रपटाला शुभेच्छा दिल्या.

एखाद्या व्यक्तीच्या जीवनावरील सिनेमा रसिकांना विशेष भावला आहे. मेरी कोम, मिल्खा सिंग, महेंद्रसिंह धोनी, संजय दत्त, सनी लिओनी असे एक ना अनेक व्यक्तींच्या जीवनावरील बायोपिक रसिकांची दाद मिळवून गेले आहेत. आता मराठी सिनेमामध्ये आणखी एका बायोपिकची चर्चा सुरु झाली आहे. नुकतेच सोशल मीडियावर 'पळशीची पीटी' या आगामी सिनेमाचे पोस्टर लॉन्च करण्यात आले आहे. हे पोस्टर समोर आल्यापासून अनेक चर्चांना उधाण आले आहे. पी. टी. उषा यांच्या जीवनावर सिनेमा आधारित असल्याच्या चर्चा सध्या जोर धरत आहेत. मात्र हा सिनेमा  पी.टी. उषा यांच्या जीवनावर आधारित असल्याचे कोणत्याही प्रकारची माहिती सिनेमाच्या टीमकडून देण्यात आलेली नाही. 

 

टॅग्स :अक्षय कुमार