Join us

...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण

By कोमल खांबे | Updated: April 28, 2025 14:40 IST

८ वर्षांनी मोठ्या असलेल्या अविनाश नारकर यांच्याशी लग्न करण्याचं खरं कारणही ऐश्वर्या यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. 

ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल आहेत. त्यांच्याकडे आदर्श कपल म्हणून पाहिलं जातं. गेली कित्येक वर्ष ते विविध माध्यमातून चाहत्यांचं मनोरंजन करत आहेत. ऐश्वर्या आणि अविनाश या परफेक्ट जोडीला चाहते फॉलो करतात. त्यांच्या सुखी संसाराचं रहस्य त्यांनी लोकमत फिल्मीला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितलं. याशिवाय वयाने ८ वर्षांनी मोठ्या असलेल्या अविनाश नारकर यांच्याशी लग्न करण्याचं खरं कारणही ऐश्वर्या यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. 

खरं तर ऐश्वर्या नारकर यांनी अविनाश नारकर यांना लग्नासाठी प्रपोज केलं होतं. नाटकाच्या बसमध्ये ऐश्वर्या यांनी त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती. अविनाश नारकर यांच्यामधला कोणता गुण आवडला? याबाबत विचारताच त्या म्हणाल्या, "खरं तर गुण आवडण्यापेक्षा आमची भांडणंच जास्त व्हायची. पण, आपला एक आतला आवाज असतो तो आपल्याला जाणवत असतो की काहीतरी आहे. या माणसासोबत मी आयुष्य घालवू शकते. किंवा हा मला आवडतो. मला त्याच्याकडूनही सॉफ्ट कॉर्नर असल्याचं जाणवलं. माझं असं झालं होतं की आपल्याला जे वाटतं ते आपण बोललं पाहिजे. तो हो बोलेल किंवा नाही बोलेल. पण, काही वर्षांनंतर असं व्हायला नको की मी बोललेच नाही. बोलले असते तर कदाचित झालं असतं का...ही हुरहुर नको लागायला". 

"त्याच्यावर खूप जबाबदाऱ्या होत्या. सगळ्यांचा विचार करणारा,काळजी घेणारा असं त्याचं व्यक्तिमत्त्व होतं. या माणसासोबत मी आयुष्य काढू शकते, असं मला वाटलं. हा माझ्यासाठी योग्य आहे. वयाचं अंतर आहे. पण, मग मी त्याला म्हटलं की मला हे योग्य वाटतंय. तेव्हा तो म्हणाला होता की बघ विचार कर. तुला अजून कोणीतरी चांगलं भेटू शकतं. तुझं शिक्षण पूर्ण व्हायचंय. तेव्हाही आमचे रुसवे फुगवे व्हायचे. हा माझ्याशी कधी कधी बोलायचाच नाही. पण, आमची केमिस्ट्री खूप छान होती किंवा आताही आहे", असंही त्यांनी सांगितलं. 

टॅग्स :अविनाश नारकरऐश्वर्या नारकर