Join us

"या देशात माणसाच्या आयुष्याला किंमत नाही", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अमेय वाघची पोस्ट, म्हणाला…

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 15:42 IST

अहमदाबाद दुर्घटनेवर अनेक सेलिब्रिटींनी पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे.

Plane Crash: अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या प्रवासी विमानाचा मोठा अपघात झाला आहे. या विमानातून २४२ प्रवासी प्रवास करत होते. शिवाय हे विमान निवासी भागात कोसळल्यामुळे स्थानिक इमारतींचंही मोठं नुकसान झालं आहे. हे विमान लंडनला जात होतं, मात्र टेकऑफनंतर काही मिनिटांतच ते खाली कोसळलं. या दुर्घटनेवर अनेक सेलिब्रिटींनी पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे. अभिनेता अमेय वाघने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक भावनिक आणि तितकीच संतप्त पोस्ट शेअर केली.

अमेय वाघने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टद्वारे त्याने "कोणाचीच चूक नसेलही कदाचित पण या देशात माणसाच्या आयुष्याला किंमत नाही… हे अंतिम सत्य! खूप वाईट घटना!" असं म्हटलं. पण, काही वेळानंतर त्याने ही पोस्ट काढून टाकली. त्यानंतर अभिनेत्याने दुसरी पोस्ट शेअर केली. अमेयने दुसऱ्या पोस्टमध्ये लिहलं, "आजचा दिवस भयानक आहे. अशी दुःखद बातमी पचवणे कठीण आहे".

गुजरातच्या अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमान(एआय-१७१) उड्डाणानंतर लगेचच कोसळले. या घटनेत विमानातील विमानातील २४१ प्रवासी आणि क्रु मेंबर्ससह सुमारे २५ स्थानिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पण, या अपघातात चमत्कारीकरित्यात्या एका प्रवाशाचा जीव वाचला वाचला आहे. विमान कोसळल्यानंतर त्यातील इंधनामुळे भीषण आग लागली, ज्यात सर्वांचा जळून मृत्यू झाला. मात्र, रमेश विश्वास नावाचा ब्रिटीश तरुण या भीषण अपघातातून वाचला आहे.  दरम्यान, या अपघाताची चौकशी एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (एएआयबी), तसेच अमेरिका आणि ब्रिटनमधील पथकांकडून आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलनुसार केली जात आहे.

अमेयच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो सध्या 'शिट्टी वाजली रे' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतोय. अमेयनं आजपर्यंत विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मराठीसह हिंदीतही काम करणारा प्रभावी अभिनेता म्हणून त्यानं आपली ओळख निर्माण केली आहे. 

टॅग्स :विमान दुर्घटनाअमेय वाघअहमदाबाद