Join us
Daily Top 2Weekly Top 5

राधिकानंतर असावरीची हवा, थेट हेलिकॉप्टर घेऊन आसावरी जाते ऑफिसला !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 14:39 IST

विशेष म्हणजे आसावरी ऑफिसला जाण्यासाठी  लक्झरी गाडीने जात नाही तर थेट हेलिकॉप्टरनेच जाते. त्यामूळे असावरीने याबाबतीत राधिकालाही मागे टाकले आहे. 

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत राधिका मसाल्यांचा व्यवसाय करून ४००कोटींची मालकीण बनली होती.आता 'अग्गबाई सूनबाई' मलिकेतली आसावरी देखील राधिकाच्या पावलावर पाऊल टाकत मोठा व्यवसाय करताना दिसणार आहे.

 विशेष म्हणजे आसावरी ऑफिसला जाण्यासाठी  लक्झरी गाडीने जात नाही तर थेट हेलिकॉप्टरनेच जाते. त्यामूळे असावरीने याबाबतीत राधिकालाही मागे टाकले आहे. 

सध्या या मालिकेचा नवीन प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रमोपेक्षा असावरीच्या हेलिकॉप्टरच्याच सीनने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. रसिक मात्र हा सीन पाहून चांगले अवाक झाल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडिओवर नेटिझन्सनी आपल्या प्रतिक्रीया देत चांगलीच खिल्ली उडवल्याचे पाहायला मिळत आहे. 

सुरुवातीपासूनच मालिकेवर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मालिकेचा दुसरा भाग आणण्याची काय गरज असाच प्रश्न रसिकांनी विचारला होता.कथानकानु सार मालिकेत कळलाकरांची निवड चुकीची सांगत नापसंती दिल्याचे पाहायला मिळाले होते. १५ मार्च पासून नव्या ढंगात सुरू झालेली मालिका आगामी काळात कितपत रसिकांना खिळवून ठेवतात यशस्वी ठरते हे पाहणे रंजक असणार आहे.

टॅग्स :निवेदिता सराफ