पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देशाला धक्का बसला. या प्रकरणावर जगभरातील राजकीय व्यक्ती, सामान्य माणसं, सेलिब्रिटींनी निषेध व्यक्त केलाय. अशातच पहलगाम हल्ल्यानंतर मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी गाजवणारा अभिनेता अतुल कुलकर्णी (atul kulkarni) काश्मिरला गेलाय. अतुलने सोशल मीडियावर याविषयी अपडेट दिले आहेत. अतुलने फ्लाइटमधील फोटो शेअर करुन त्याच्या मनातील भावना कॅप्शनद्वारे व्यक्त केल्या आहेत. काय म्हणाला अतुल?
अतुल कुलकर्णीचं काश्मिरमध्ये उड्डाण
अतुल कुलकर्णीने सोशल मीडियावर चार फोटो शेअर केले आहेत. यात अतुल कुलकर्णीने इन्टाग्रामवर चार स्टोरी शेअर केल्या आहेत. अतुल कुलकर्णीने फ्लाइटमधील फोटो शेअर केले आहेत. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये हाउसफुल्ल असलेली विमानं आज रिकामी आहेत. त्यामुळे अतुल कुलकर्णी लिहितो की, "चला, काश्मीरला!, विमानं माणसांनी भरभरुन काश्मीरला जात होती. या विमानांना पुन्हा भरायचं आहे. आतंक को हराना है", अशा शब्दात पोस्ट करुन अतुल कुलकर्णीने विमानप्रवासाचा अनुभव सांगितला. याशिवाय काश्मीरला पुन्हा सर्वांनी न घाबरता बिनधास्तपणे जावं, असं आवाहन केलंय.
पहलगाम हल्ल्यानंतर अपडेट्स
काश्मिरमध्ये पहलगाम भागात दहशतवाद्यांनी जो भ्याड हल्ला केला त्यानंतर सुरक्षा दलाने दहशतवाद्यांवर मोठी कारवाई सुरू केली आहे. सुरक्षा दलांनी काल रात्री बांदीपोरा जिल्ह्यातील नाझ कॉलनी भागात लष्कर-ए-तोएबा (LET) चा दहशतवादी जमील अहमद याचं घर उद्ध्वस्त केलं आहे. पहलगाम हल्ल्यानंतर आतापर्यंत सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त केली आहेत. याआधी शनिवारी रात्री सुरक्षा दलांच्या पथकाने दहशतवादी अदनान शफीचं घर पाडलं होतं. अदनान २०२४ मध्ये लष्कर-ए-तोएबा या दहशतवादी संघटनेत सामील झाला आणि गेल्या एक वर्षापासून तो सक्रिय होता.