Join us

उडता पंजाबनंतर सेंसॉरचा आता ‘१२३४’ लाही दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2016 11:56 IST

‘उडता पंजाब’ या हिंदी चित्रपटानंतर सेन्सॉर बोर्डने आता ‘१२३४’ या मराठी चित्रपटालाही दणका देत ४५ बदल सुचवले आहेत.  मिलिंद ...

‘उडता पंजाब’ या हिंदी चित्रपटानंतर सेन्सॉर बोर्डने आता ‘१२३४’ या मराठी चित्रपटालाही दणका देत ४५ बदल सुचवले आहेत.  मिलिंद कवडे दिग्दर्शित ‘१२३४’ हा सस्पेन्स-थ्रीलर चित्रपट आहे.  सेंसॉरने सुचविलेले बदल हे दिग्दर्शकाला मान्य नसून ते न पटण्यासारखे आहेत. जसे की चित्रपटातील ‘सेनापती बापट मार्ग’ या शब्दातील ‘बापट’ शब्द, ‘मराठी’ व ‘बिहारी’ हे शब्द, ‘वरळी पोलिस स्टेशनचा बोर्ड’ सेन्सॉरने काढून टाकण्यास सांगितले. या चित्रपटात संजय नार्वेकर, भूषण प्रधान, प्रिया मराठे, विजय मौर्या, जयवंत वाडकर, अनिकेत केळकर, विशाखा सुभेदार, तेजा देवकर, संजय मोने, अभिजीत चव्हाण, अरूण कदम, विजय कदम, यतिन कार्येकर,मृणालिनी जांभळे, अंशुमन विचारे,  किशोर चौघुले प्रणव रावराणे आदी कलाकार आहेत. हा चित्रपट येत्या ५ आॅगस्ट रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहेत.