Join us

आदिनाथ डिअर डॅडमध्ये नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2016 13:30 IST

अभिनेता अरविंद स्वामी डिअर डॅड या चित्रपटाद्वारे कित्येक वर्षानंतर बॉलिवुडमध्ये पुनरागमन करत आहे. या चित्रपटात अभिनेता आदिनाथ कोठारेही काम ...

अभिनेता अरविंद स्वामी डिअर डॅड या चित्रपटाद्वारे कित्येक वर्षानंतर बॉलिवुडमध्ये पुनरागमन करत आहे. या चित्रपटात अभिनेता आदिनाथ कोठारेही काम करत असल्याची कित्येक दिवसांपासून चर्चा आहे.इतकेच काय तर आदिनाथ कोठारेच्या विकिपिडियामध्येही या चित्रपटाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. पण आदिनाथच्या फॅन्ससाठी वाईट बातमी आहे. तो या चित्रपटात काम करत नसल्याचे डिअर डॅड या चित्रपटाचे निर्माते शान व्यास यांनी सांगितले आहे.पण आदिनाथ लवकरच बॉलिवुडमध्ये पदार्पण करणार असल्याचे खरे आहे. आदिनाथ निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकर दिग्दर्शित करत असलेल्या चित्रपटात झळकणार आहे. महेश मांजरेकर यांनी निर्मित आणि दिग्दर्शित केलेला काकस्पर्श हा मराठी चित्रपट प्रचंड गाजला होता.याच मराठी चित्रपटाचा रिमेक हिंदीत केला जाणार आहे आणि या चित्रपटात अभिनेता आदिनाथ कोठारे प्रमुख भूमिका साकारणार आहे. तसेच अभिनेता अरविंद स्वामीही या चित्रपटात प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे.त्यामुळे आदिनाथ अरविंद स्वामीसोबत डिअर डॅडमध्ये नव्हे तर काकस्पर्श रिमेकमध्ये काम करत आहे. अरविंद स्वामी कित्येक वर्षांनंतर बॉलिवुडमध्ये काम करत असल्याने त्याच्यासोबत कोणत्या चित्रपटात आदिनाथ काम करतोय याबद्दल लोकांमध्ये गोंधळ उडालेला आहे.