Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री स्पृहा जोशीची बहीण आहे तिच्या इतकीच दिसायला सुंदर, या क्षेत्रात आहे कार्यरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2022 07:00 IST

Spruha Joshi : स्पृहा जोशीच्या सख्ख्या बहिणीबद्दल फार कमी लोकांना माहित आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री स्पृहा जोशी(Spruha Joshi)ने आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. मोरया, पैसा पैसा यासह विविध चित्रपटातील भूमिकांमधून स्पृहाने आपल्या अभिनयाची छाप पाडली. चित्रपटाशिवाय तिने एका लग्नाची दुसरी गोष्ट, एका लग्नाची तिसरी गोष्ट यासारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच तिने नाटकातही काम केले आहे. तिचा खूप मोठा फॅन फॉलोव्हिंग असून तिच्या प्रोफेशनल लाइफसोबत खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक असतात. स्पृहाला एक सख्खी बहिण असून तिचे नाव क्षिप्रा आहे. तीदेखील स्पृहाप्रमाणे खूप सुंदर दिसते.

सोशल मीडियावर स्पृहा जोशी ही खूप सक्रिय असते. ती बऱ्याचदा फोटो देखील शेअर करत असते. काही वर्षांपूर्वी तिने वरद लघाटे याच्याशी लग्न केले आहे. तिचा नवरा हा सध्या मार्केटिंग क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. तिच्या पतीचा अभिनय क्षेत्राशी काहीही संबंध नाही. स्पृहाला सख्खी बहिणदेखील आहे. तिच्या बहिणीचे नाव आहे क्षिप्रा जोशी. क्षिप्रा जोशी ही स्पृहा प्रमाणेच दिसायला खूप सुंदर आहे. मात्र ती अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत नसून ती जिम ट्रेनर आहे.

ती अनेक वर्षापासून लोकांना फिट राहण्याचे सल्ले देते आणि या क्षेत्रात ती खूप चमकदार कामगिरी सध्या करत आहे. सोशल मीडियावर तीदेखील सक्रीय आहे आणि बहिणीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. क्षिप्रा ही गेल्या अनेक वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करत आहे. या क्षेत्रामध्ये तिने उल्लेखनीय कामगिरी देखील केली असून तिला अनेक पुरस्कार देखील यासाठी मिळाले आहेत.
टॅग्स :स्पृहा जोशी