Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रिया बापट झाली बोल्ड अ‍ॅण्ड ग्लॅमरस, सोशल मीडियावर शेअर केले फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 16:54 IST

या फोटोंमध्ये प्रिया खूपच ग्लॅमरस आणि बोल्ड दिसतेय.

अभिनेत्री प्रिया सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. याशिवाय नेहमी ती सोशल मीडियावर फोटोजही शेअर करत असते आणि या फोटोंतून ती प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडताना पहायला मिळते. प्रियाने काही दिवसांपूर्वी काळ्या रंगाच्या ड्रेसमधला फोटोशूट केले आहे. या फोटोंमध्ये प्रिया बापट खूपच ग्लॅमरस आणि बोल्ड दिसतेय. तिच्या फॅन्सना देखील तिचा हा लूक आवडला आहे. लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून त्यांनी आपली पसंती दर्शवली आहे. 

'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रिया बापटने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.

या सर्व चित्रपटांमध्ये प्रियाच्या अभिनयाचे प्रेक्षकांसोबत समीक्षकांनीही कौतुक केले. सिटी ऑफ ड्रीम्स'च्या माध्यमातून प्रिया डिजिटल माध्यमात देखील आपली छाप उमटवली आहे.

प्रियाने चित्रपट, नाटक, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम केले आहे. नवा गडी नवं राज्य या नाटकात तसेच अधुरी एक कहानी, शुभंकरोती, दे धमाल, आभाळमाया यांसारख्या मालिकांमधील तिच्या भूमिकांचे कौतुक झाले आहे.

टॅग्स :प्रिया बापट