Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री प्रार्थना बेहरेनं शेअर केला ग्लॅमरस फोटो, पाहून तिच्या अदा चाहते झाले फिदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 11:16 IST

कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा, मस्का अशा विविध मराठी सिनेमात काम केलं आहे.

प्रार्थना बेहरेने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरुन केली. तिने 'पवित्र रिश्ता' मालिकेतून छोटा पडदा गाजवला. ' त्यानंतर 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी सिनेमातून एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली.कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा, मस्का अशा विविध मराठी सिनेमात काम केलं आहे.

प्रार्थना सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती देत असते. गेल्या काही दिवसांपासून प्रार्थना सतत आपलं फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर करते आहे. प्रार्थनाने तिचा सुंदर फोटो  फोटो सोशल मीडियावर केला आहे. फोटोत प्रार्थना खूपच ग्लॅमरस दिसते आहे. फॅन्सनी प्रार्थनाच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.  काही वेळातच हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालंय.

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर प्रार्थना लवकरच छूमंतर या मराठी सिनेमात दिसणार आहे.यात तिच्यासोबत रिंकू राजगुरू, सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाच्या काही सीन्सचे शूटिंग लंडनमध्ये झाले आहे. त्याचबरोबर ती एका हिंदी बेवसीरिजमध्ये देखील दिसणार आहे.

टॅग्स :प्रार्थना बेहरे