फेब्रुवारी महिन्याची सुरुवात होताच हवेत एक वेगळीच हुरहूर जाणवू लागते. प्रेमाचे वारे हळुवारपणे मनाला स्पर्श करू लागतात आणि या भावनांना शब्द देण्यासाठी येतो तो खास दिवस १४ फेब्रुवारी, व्हॅलेंटाईन डे. एरवी मनातच दडवून ठेवलेल्या भावना, न बोललेले शब्द आणि व्यक्त न झालेलं प्रेम या दिवशी धाडस करून समोर येतं. आपल्या आवडत्या व्यक्तीसमोर प्रेमाची कबुली देणं, नात्याला नवी सुरुवात देणं किंवा जुन्या नात्यांमध्ये पुन्हा एकदा प्रेमाची ऊब निर्माण करणाऱ्यांसाठी हा दिवस खास ठरतो.
अभिनेत्री नम्रता गायकवाड यंदाच्या व्हॅलेंटाईन डे ‘काहीतरी वेगळे’ करणार आहे. तिने सोशल मीडियावर अभिनेता तुषार कावळेसोबतचे काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. हे दोघे एकमेकांना डेट करतायेत का? अशा चर्चाना उधाण आलं आहे तर या दोघांचं एक ‘काहीतरी वेगळे’ हे नवं, फ्रेश सोलो गाणं ‘व्हॅलेंटाइन डे’ च्या मूहूर्तावर रसिकांच्या भेटीला येत आहे.
हे गाणं केवळ एका जोडप्याची कथा सांगत नाही, तर आजच्या तरुणाईच्या नातेसंबंधांचा आरसा आहे. आपण खरंच क्षण जगतोय… की फक्त त्यांना पोस्ट करतोय? हा महत्त्वाचा प्रश्न हे गाणं प्रभावीपणे अधोरेखित करतं. युथफूल आणि भावस्पर्शी असलेलं ‘काहीतरी वेगळे’ हे गाणं अभिनेत्री नम्रता गायकवाड आणि अभिनेता तुषार कावळे यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे. फ्लॉसम एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली साकारलेल्या या गाण्याचं संगीत दिग्दर्शन, लिरीक्स आरोह कांगो यांनी केलं असून, देव आहिरराव आणि साक्षी यांच्या आवाजात हे गाणं स्वरबद्ध झालं आहे. गाण्याचं दिग्दर्शन रोहित जाधव यांनी केलं असून, सह-दिग्दर्शक म्हणून मयूर परांकर यांनी साथ दिली आहे. क्रिएटिव्ह दिग्दर्शक म्हणून स्वप्नील पाटील यांनी प्रकल्पाची धुरा सांभाळली आहे. संगीत निर्मिती अफलातून म्युझिकची असून, प्रकल्प प्रमुख म्हणून रेखा मोरे आणि निलेश खंडागळे कार्यरत आहेत. भावना, वास्तव आणि प्रश्नांची गुंफण असलेलं ‘काहीतरी वेगळे’ हे गाणं आजच्या पिढीला नात्यांकडे नव्या नजरेनं पाहायला भाग पाडणारं ठरत आहे.
Web Summary : Namrata Gaikwad's Valentine's Day surprise: a romantic music video 'Kahitari Vegle' with Tushar Kawale. It explores modern relationships, questioning if we truly live moments or just post them. The song features Dev Ahirrao and Sakshi's vocals, with direction by Rohit Jadhav.
Web Summary : नम्रता गायकवाड़ का वैलेंटाइन डे सरप्राइज: तुषार कावले के साथ एक रोमांटिक म्यूजिक वीडियो 'काहीतरी वेगले'. यह आधुनिक रिश्तों की पड़ताल करता है, यह सवाल करता है कि क्या हम वास्तव में क्षणों को जीते हैं या सिर्फ उन्हें पोस्ट करते हैं। गाने में देव अहिरराव और साक्षी के स्वर हैं, और रोहित जाधव द्वारा निर्देशन किया गया है।