Join us  

नेहा पेंडसेनंतर ही अभिनेत्री अडकली लग्नबेडीत, पहा तिच्या लग्नाचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 11:22 AM

नेहा पेंडसेनंतर आता तिचीच ही मैत्रीण विवाहबंधनात अडकली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. कुणी लग्नबेडीत अडकतंय तर कुणी रिलेशनशीपमध्ये. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री नेहा पेंडसे विवाहबंधनात अडकली. तिचा विवाहसोहळा पुण्यात पार पडला होता. आता तिचीच अभिनेत्री मैत्रीण लग्नबेडीत अडकली आहे. ही मैत्रीण म्हणजे दिशा दानडे. 

नाटक व मालिकांमध्ये आपल्या अभिनय कौशल्याने घराघरात पोहचलेली अभिनेत्री दिशा दानडे नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे. तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पहायला मिळत आहेत.

तिच्या नवऱ्याचे नाव सुहास लखन असून तोदेखील मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आहे. या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पहायला मिळत असून त्यांच्या फोटोवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

दिशा दानडे हिने फुलराणी, गुण्यागोविंदाने या नाटकात काम केले आहे. तर छोट्या पडद्यावरील मालिका जागो मोहन प्यारेमध्ये देखील तिने काम केले आहे.

या मालिकेतील तिने केलेली भूमिका रसिकांच्या चांगलीच लक्षात राहिली आहे.

टॅग्स :नेहा पेंडसे