Join us

अमृता खानविलकरला कोणत्या गोष्टीचं व्यसन? स्वतःच केला खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 12:01 IST

जी गोष्ट सगळ्या अभिनेत्री टाळतात, त्याचंच अमृता खानविलकरला आहे वेड!

प्रत्येकालाच काही ना काही सवय किंवा व्यसन असतंच. कुणाला कॉफीचं, कुणाला शॉपिंगचं, तर कुणाला सोशल मीडियाचं आणि याला अभिनेत्री अमृता खानविलकरही अपवाद नाही.नेहमी आपल्या दमदार अभिनयासोबतच स्टायलिश लूकसाठी चर्चेत असणारी अमृता खानविलकर एक हटके व्यसन आहे. याचा खुलासा खुद्द तिनंच केला होता. अनेकांनी तिच्या या व्यसनाशी लगेचच रिलेट केलं. काय आहे अमृताचं हे खास व्यसन? जाणून घ्या घेऊयात.

अभिनेत्री 'व्हायफळ' या पॉडकास्टमध्ये पोहचली होती. तेव्हा अमृतानं म्हटलं होतं की, "'माझं एकच व्यसन आहे आयुष्यात, ते म्हणजे शुगर, ते म्हणजे चॉकलेट आणि ते मला सगळं खूप आवडतं. अमृताच्या या कबुलीनं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण, अभिनेत्री या सहसा गोड पदार्थ खात नाही. आहारातून साखर टाळण्यावर त्यांचा भर असतो. 

पुढे तिला अमृताला विचारलं की, 'तू बेकिंग वगैरे करतेस का कधी की नाही' त्यावर उत्तर देत अमृता म्हणाली, 'नाही! वाटतं का तुला? माझ्या चेहऱ्याकडे बघून. मी चॉकलेट फाँद्यिव्ह मस्त बनवते. माझ्या आईसाठी, तिला खूप आवडतं ते. मी कुकीज बनवू शकते. संपतो विषय आणि त्याच्यानंतर मला चपात्या येतात, भाकरी येते आणि मला असं वेगवेगळंच काहीतरी येतं. म्हणजे मग मला गुलाबजाम खूप छान येतात. तर माझा नवरा कधीतरी म्हणतो, चपाती आणि काय गुलाबजाम खाणार आहे का मी? असं वगैरे. मी म्हणते खाण्यापिण्याची अपेक्षा माझ्याकडून करा. मला अंड्याचे छान ऑम्लेट करता येतात". 

अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर ती अलिकडे 'सुशीला-सुजीत' सिनेमातील आयटम साँग चिऊताई चिऊताई दार उघडमुळे चर्चेत आली होती.  सगळीकडे या गाण्याची क्रेझ पाहायला मिळाली. तर त्याआधी अमृता 'लाईक आणि सबस्क्राईब' सिनेमात झळकली होती. यामध्ये तिच्याबरोबर अमेय वाघ, शुभंकर तावडे, राजसी भावे हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते. अमृता खानविलकर गेल्या कित्येक वर्षांपासून दमदार अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ करत आली आहे. मराठीतील लोकप्रिय आणि आघाडीच्या अभिनेत्रींपैकी तिचं नाव येतं. अभिनेत्री अमृता खानविलकर तिच्या खाजगी आणि वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असते.

टॅग्स :अमृता खानविलकरमराठी अभिनेता